नागरी सेवा रजा नियम १९८१

व्याख्या – ( नियम क्र. १० ) :

सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यास कार्यालयात अनुपस्थित राहण्याची दिलेली परवानगी म्हणजे रजा होय.
१) रजा ही कर्मचाऱ्याला ‘हक्क’ म्हणून मागता येत नाही.
२) रजा मंजूर करणे अथवा न करणे हा सक्षम प्राधिकाऱ्याचा अधिकार आहे.
३) कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेच्या प्रकारात रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याला बदल करता येणार नाही. 

Table of Contents :

रजा मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी (नियम क्र. ११) :

१) कर्मचाऱ्याने मागितलेली रजा त्याच्या खात्यावर शिल्लक आहे काय ?
२) कार्यालयीन कामाची निकड व परिस्थिती लक्षात घेण्यात यावी.
३) कर्मचाऱ्याला मागील रजेवरून सक्तीने बोलाविले होते काय ?
४) पुर्वीच्या रजेवरून परत आल्यानंतर कर्मचाऱ्याने किती व कोंणत्या स्वरुपाची सेवा बजावली ?
५) एखाद्या सेवेतील किंवा विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कामासाठी आवश्यक असलेल्या किमान संख्येहून कमी होता कामा नये.
६) सहजगत्या कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा मंजूर करता येईल , हे रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने ठरवावे. 

रजा मागणीची कारणे :

 • खाजगी कारण :- रजेच्या विहीत अर्जासोबत (परिशिष्ट ५ नमुना १) कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही.
 • वैद्यकीय कारण :- रजेच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय प्राधिकारी (नियम क्र. ४१ व ४२)
  • वैद्यकीय मंडळ
  • जिल्हा शल्य – चिकीत्सक
  • प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी
  • नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक 

वैद्यकीय प्रमाणपत्र कोणाचे (नियम क्र. ३२, ३८ व ४०) :

१.) राजपत्रित अधिकारी साठी : – जिल्हा शल्य चिकीत्सक अपवादात्मक परिस्थितीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक (प्रतिस्वाक्षरी जिल्हा शल्य चिकीत्सक)

२.) अराजपत्रित कर्मचारी साठी :- प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक

३.) वर्ग ४ मधील कर्मचारी साठी :- सक्षम प्राधिकारी त्यास योग्य वाटेल. असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.
एखादा कर्मचारी आजारीपणाच्या कारणास्तव अल्पमुदतीच्या अंतराने पुन्हा पुन्हा रजेची म्रागणी करीत असेल तर त्याला वैद्यकीय मंडळाकडे तपासणीसाठी पाठविले जाईल. 

रजेला जोडून रजा घेणे (नियम क्र. १५) :

 •  कोणत्याही प्रकारची रजा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रजेला जोडून मंजूर करता येईल.
 • किरकोळ रजेला जोडून इतर कोणतीही रजा घेता येणार नाही. कारण किरकोळ रजा ही या नियमाखाली रजा म्हणून धरली जात नाही.
 • एक वर्षांची सतत सेवा झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या स्थायी किंवा अस्थायी पदावर होंते व पहिल्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर दुसऱ्या पदावर हजर होण्याच्या कालावधीतील खंड ६ दिवसांपेक्षा जास्त नसेल तर पुर्वीच्या पदावरील शिल्लक रजा नवीन पदावरील रजेच्या हिशोबात धरली जाते.( नियम क्र. २१) 
 • योग्य मार्गाने अर्ज पाठवून कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात निवड झाली असेल व कर्मचाऱ्याने पहिल्या पदाचा राजीनामा दिलेला असेल व दुसऱ्या पदावरती रुजू होई पर्यंतचा खंडीत कालावधी पदग्रहण अवघीपेक्षा जास्त नसेल तर पुर्वीच्या पदावरची रजा नवीन पदावरील सेवे साठी विचारात घेतली जाते. ( नियम क्र. २२)
 • शासकीय सेवेतून बडतर्फ केलेल्या, काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याच्या रजेसंबंधीचा कोणताही हक्क त्या तारखेपासून समाप्त होतो. मात्र बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अपिलानंतर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाल्यास त्याचे रजेबाबतचे सर्व हक्क पुर्नस्थापित होतात.

रजेवरून परत हजर होणे (नियम क्र. ४६ व ४७) :

 • रजेवर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास मंजूर रजा संपण्यापूर्वी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय रजेवरून परत हजर होता येणार नाही.
 • खाजगी कारणास्तव रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने रजा संपल्यानंतर तात्काळ हजर होणे आवश्यक आहे. अन्यथा ते एक गैरशिस्तीचे कारण समजले जाईल. रुजू अहवालासोबत कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही.
 • वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कामावर हजर होता येणार नाही.
 • रजा संपण्यापूर्वी कर्मचाऱ्यास सक्षम प्राधिकारी कामावर हजर होण्यास सांगू:शकतो. परंतू अशा कर्मचाऱ्याचे कामावर हजर होणे ऐच्छिक की सक्तीचे हे आदेशात नमूद करणे आवश्यक आहे; 

रजेचे प्रकार :

देय व अनुदेज्ञ रजा विशेष रजा
१) अर्जित रजा – नियम ५० व ५१ १) प्रसूति / गर्भपात रजा – नियम ७४
२) अर्धवेतनी रजा – नियम ६० २) विशेष विकलांगता रजा – नियम ७५ ( हेतुपुरस्कर झालेल्या इजेबद्दल )
३) परीवर्तीत रजा – नियम ६१३) विशेष विकलांगता रजा – नियम ७६ ( अपघाती इजेबद्दल )
४) अनर्जीत रजा – नियम ६२४) रुग्णालयीन रजा – नियम ७७
५) असाधारण रजा – नियम ६३५) क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात रजा – नियम ७९ व परिशिष्ट -३
६) बालसंगोपण रजा (शा. नि. २३/७/१८)
७) अध्ययन रजा नियम
टीप : अनु क्र. ३ व ४ हे ही अर्ध वेतनी रजेचाच उप प्रकार आहे:

सर्व साधारण रजा

अर्जित रजा – नियम ५० व ५१ 

 •  प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्येकी १५ दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.
 • ही रजा ३०० दिवसांच्या कमाल मयदिपर्यंत साठविता येते. ३०० दिवस झाल्यावर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला १५ दिवस अनुज्ञेय असतात पण, ३०० + १५ असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम १५ दिवसातुन वजा करावी च ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहिलले दिवस व्यपगत होतील. मात्र एकाच वेळी सलग १८० दिवसापर्यंत ही रजा मंजूर करता येते.
 • प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याना अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते.
 • सेवेचा कॅलेडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोंडावयाचा असतो. 
 • असाधारण रजा / अकार्य दिन / निलंबन या कालावधीसाठी १ / ९० या दराने ही रजा कमी केली जाते. मात्र १५ दिवसापेक्षा जास्त कपात करता येणार नाही.
 • रजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णांकात केले जातात.
 • ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते. शक्‍यतोवर परिशिष्ट – ५ मधील नमुना — १ मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.
 • रजा वेतन :- रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराने संपूर्ण रजा काळात “रजा वेतन” मिळेल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ मिळते परंतु प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळेल. 

अर्धवेतनी रजा – नियम ६०

 • प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्येकी १० दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.
 • ही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याना ५ / ३ या दराने जमा करण्यात येते.
 • कॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.
 • अकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा १ / १८ या दराने कमी केली जाते. 
 • रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास ते नजीकच्या दिवसांत पूर्णाकित केले जातात.
 • ही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.
 • या रजेंच्या साठवणुकीवर मर्यादा नाही.
 • या रजे साठी विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असतो. ( परिशिष्ट – ५ नमुना – १ )
 • रजा वेतन :- या काळात रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराच्या ५० % वेतन व त्यावर आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र, घरभाडे भत्ता व शहर पुरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय. 

परीवर्तीत रजा – नियम ६१

ही रजा वैदयकीय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अधीन राहून मंजूर केलीं जाते.

 • कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणा-या अधिका-याची खात्री पटली पाहिजे.
 • पूर्णवेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते.
 • दुप्पट दिवस अर्धवेतनी रजेच्या खाती टाकले जातात.
 • कर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्थवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची रक्‍कम वसूल करण्यात येते. 
 • अपवाद
 • खालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.
  • प्रसुती रजेला जोडून ६० दिवसांच्या मयदि पर्यंत बालसंगोपनासाठी
  • लोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीं ९० दिवसांपर्यंत.
  • विपश्यनासाठी १४ दिवसांपर्यंत, तीन वर्षातून एकदा / संपूर्ण सेवेत ६ वेळा
 • रजा वेतन :- अर्जित रजेवर गेल्यावर मिळते त्याचदराने म्हणजे पूर्ण दराने रजा वेतन अनुज्ञेय राहील. 

अनर्जीत रजा – नियम ६२

 • कोणतीच रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते. म्हणजेच हा रजेचा Over Draft आहे.
 • ही रजा अर्थवेतनी स्वरुपात मंजूर करता येते.
 • संपूर्ण सेवेच्या कालावधीत ३६० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.
 • एकावेळी वैदयकीय प्रमाणपत्राखेरीज ९० दिवसांपर्यंत व वैदयकीय प्रमाणपत्र धरून जास्तीत जास्त १८० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते. 
 • ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजे मधून अनर्जीत रजा वजा करता येते.
 • ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली केली जाते.
 • ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचा-यांनाच मंजूर करता येते.
 • रजा वेतन :- अर्धवेतनी रजेंप्रमाणे रजा वेतन या रजेत मिळते. 

असाधारण रजा – नियम ६३

 • कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल
 • दुसऱ्या प्रकारची रजा अनुज्ञेय असेल परंतू कर्मचाऱ्याने असाधारण रजाच मागितलेली असेल तर
 • रजा वेतन :- या रजे मध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचारी खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि. ०४/०९/२०००. याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येईल. 
 • कायम सेवेतील कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा ५ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.
 • अस्थाई कर्मचा-यांना ही रजा खालील मर्यादेर्यत मंजूर करता येते.
  • कोणताही कर्मचारी – वैदयकीय प्रमाणपत्राशिवाय – ३ महिन्यांपर्यंतं.
  • ३ वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे ६ महिन्यांपर्यंत.
  • ५ वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे १२ महिन्यांपर्यंत.
  • १ वर्षाच्या सेवेनंतर – कर्करोग, मानसिक रोग यासाठी – १२ महिन्यांपर्यंत.
  • १ वर्षाच्या सेवेनंतर – क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी – १८ महिन्यांपर्यंत
  • ३ वर्षाच्या सेवेनंतर – लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी – २४ महिन्यांपर्यंत 

विशेष रजा

प्रसुती रजा / गर्भपात रजा – नियम ७४

 • महिला शासकीय कर्मचा-यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते.
 • महिला कर्मचा-यांना १८० दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.
 • शासन निर्णय दि. १५/०१/२०१६ अन्वये स्थायी /अस्थायी महिला कर्मचा-यांना पुर्ण वेतन अनुज्ञेय.
 • अस्थायी महिला कर्मचा-यांकडून सेवा समाप्तीनंतर दोन वर्षे सेवा करण्याची हमीपत्र लिहून घ्यावे. 
 • याशिवाय शा. नि. २८/०७/१९९५ प्रमाणे या रजेस बालसंगोपनासाठी ६० दिवसांची परावर्तीत रजा व अनर्जीत रजा किंवा अनुज्ञेय रजा धरुन १ वर्षापर्यंत मंजूर करता येईल.
 • विकलांग अपत्य असल्यास महिला कर्मचारी व पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी हयांना संपुर्ण सेवेत ७३० दिवस विशेष रजा अनुज्ञेय (शा.नि. २२/०९/२०१६) 

गर्भस्त्राव / गर्भपात

 • प्रसुती रजेच्या वरील अटी ब शतींच्या अधीन राहून संपूर्ण सेवेच्या कालावधीत ४५ दिवस. परंतु दोन पेक्षा कमी हयात अपत्ये ही अट यासाठी लागू नाही.
 • दत्तक मुलांसाठी विशेष रजा शा. नि. वित्त विभाग क्रमांक अरजा/२४९५/२६/खेवा ९ दिनांक २६/१०/१९९८
 • मुल १ वर्षाचे आत असल्यास १८० दिवस
 • मुल १ वर्षाचे पुढे असल्यास ९० दिवस
 • स्वतःचे एक अपत्य असतानाही घेता येईल.
 • या रजेस जोडून बाल संगोपन अअ ( E.L. सुद्धा ) घेता येईल. शा. नि.वि. वि. १५/३/२०१७ 

बाल संगोपन रजा

 • कोणाला मिळेल – राज्य शासकीय महिला कर्मचारी, पत्नी नसलेले पुरूष शासकीय कर्मचारी, पत्नी असाध्य आजाराने अंथरूनाला खिळलेली आहे असा पुरूष कर्मचारी, एक वर्ष शासकीय सेवा पुर्ण झालेला कर्मचारी
 • किती मिळेल – १८० दिवसांची कमाल मर्यादेत
 • अटी आणि शर्ती –
  • १) मुलांचे वय १८ वर्षे होइपर्यंतच
  • २) एका वर्षामध्ये दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत
  • ३) सेवा कालावधीत १/ २/ ३ / ४ टप्यात घेता येते मात्र एका कॅलेंडर वर्षामध्ये तीन टप्प्यातच घेता येते.
  • ४) पहिल्या दोन हयात आपत्यां करताच लागु राहील.
  • ५) अर्जीत रजा, अर्धवेतनी रजा व प्रसुती रजेला जोडुन ही रजा घेता येईल.
  • ६) रजेच्या कालावधीत रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने वेतन मिळत होते त्या दराने रजा वेतन मिळेल
  • ७) परिवीक्षाधीत कालावधीत ही रजा मिळणार नाही
  • ८) रजा हक्क म्हणुन मागता येणार नाही
  • ९) रजेचा हिशोब शा. नि. नमुद केलेल्या विहीत नमुन्यात ठेवावा.
 • शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक : संकीर्ण-२०१७/शप्र.क्र.२५/सेवा-६ 

विशेष विकलांगता

( अ ) हेतूषुरस्पर झालेल्या इजेबद्दल – नियम ७५

 • पहिल्या १२० दिवसांसाठी — अजित रजा वेतनाइतकी
 • उरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजेइतकी.
 • स्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधींसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धवेतनी रजेच्या खातीं खर्ची होईल . 

( ब ) अपघाती – नियम ७६

 •  पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करताना / त्याच्या परिणामी इजा झाल्यास.
 • विकलांगता ही पदाच्या कर्तव्याच्या परिणामी झाल्याचे सक्षम प्राधिका-याने व प्राधिकृत वैदयकीय अधिका-याने प्रमाणित करणे आवश्यक.
 • रजेचा कालावधी जास्तीत जास्तं २४ महिने
 • रजा वेतन
  • पहिल्या १२० दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाएवढी
  • उरलेल्या कालावधीसाठी – अर्ध वेतनी रजा वेतनाएवढी 

रुग्णालयीन रजा – नियम ७७

 • वर्ग-४ चे कर्मचारी व यंत्र सामग्री ,स्फोटके , द्रव्ये , विषारी औषधे हाताळणारे वर्ग -३ चे कर्मचारी यांनाच फक्त अनुज्ञेय असतें.
 • पदाची कर्तव्ये पार पाडत असताना रजेचा कालावधी जास्तीत जास्त २८ महिने रजा वेतन
  • पहिल्या १२० दिवसांसाठी — अजित रजा वेतनाएवढी
  • उरलेल्या कालावधीसाठी — अर्धवेतनी रजा वेतनाएवढी 

श्वानदंशा वरील उपचारासाठी – नियम क्र. ९७

पिसाळलेला कुत्रा किंवा इतर एखादा प्राणीं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला चावला व त्याला रेबीज हा रोग झाल्यास त्यावर उपचार घेण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना ३ आठवड्यांची विशेष किरकोळ रजा मिळेल . ही रजा कोणत्याही खर्चखाती टाकली जाणार नाही. 

विशेष किरकोळ रजा

 • कुटुंब नियोजनास प्रोत्साहन.
 • सेवा पुस्तकात नोंद घेणे.
 • कर्मच-यांना स्वतः. वरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस
  • पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यास दुस-या वेळेस ६ दिवस.
 • पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान, देखभालीसाठी पुरुष कर्मचा-यांना ७ दिवस.
 • महिला कर्मचा-यांना प्रसुती व्यतिरिक्त इतर वेळीं किंवा कायदेशीर गर्भपातानंतर शस्त्रक्रिया केल्यास १४ दिवस.
 • संतती प्रतिबंधक उपकरण बसविण्यासाठी एक दिवस

शासन निर्णय वित्त विभाग क्र. एलव्हिइ/१४८०/सीआर १३९९/एसईआर ९. दिनांक १४/७/१९८१ 

अध्ययन रजा

 • कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी
 • कमीत कमी पाच वर्षाची सेवा
 • रजा संपल्यावर कामावर परत येणे आवश्यक -कमीत कमी ३ वर्षे सेवा करणे गरजेचे आहे.
 • हकक म्हणून मागता येत नाही.
 • एकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.
 • भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याने सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.
 • अभ्यासक्रम/प्रशिक्षण लाकहिताच्या दृष्टीने निश्‍चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.
 • रजा कालावधी १२ ते २४ महिने. 

कर्करोग / कुष्ठरोग / पक्षाघात रजा मंजूरी

 • पुर्ननियुक्ती : वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्‍ती प्राधिकारी पुर्ननियुक्ती देऊ शकतात. प्रथम नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणी झाली असल्यास पुर्ननियुक्ती वेळी वैदयकीय तपासणीची आवश्यकता नसते.पूर्वीच्या सेवा व वेतन संरक्षित केले आहे.
 • कर्करोग / कुष्ठरोग/पक्षाघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. नि. दि. २०/०१/२००५ प्रमाणे एड्सग्रस्तांनाही सदर सवलत अनुज्ञेय केली आहे , परंतु एचआयव्ही पॉझिटिव्ह यांना मात्र अनुज्ञेय नाही.
 • क्षयरोग सवलती तीन हयात मुलांएवढे मर्यादेत असलेल्या कुटुंबाच्या कर्मचा-यास अनुज्ञेय ठरतात. दि. २०/३/२००९ पासून शासनाने छोटया कुटुंबाची मर्यादा दोन हयात अपत्यांची संख्या विहित केली असल्याने या तारखेनंतर तिसरे अपत्य कुटुंबात वाढल्यास अशा कुटुंबातील कर्मचा-यास सदर सवलत मिळणार नाही.
 • सेवानिवृत्त सवलती बंद होतात.
 • रजा वेतन : अजित रजेप्रमाणे या रजा काळात पर्ण दराने वेतन अनज्ञेय. 
 • प्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा.
 • तदनंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा
 • तद्नंतर वैदयकीय सल्ल्यानुसार असाधारण रजा. सर्व प्रकारच्या रजांच्या कालावधीची मर्यादा तीन वर्ष.
 • सक्षम प्राधिकारी – प्रादेशिक अधिकारी / विभाग प्रमुख
 • रजेवर असताना उपचार — शासकीय / खाजगी वैदयकीय अधिकार
 • कामावर रुजू होण्यासाठी वैदयकीय तपासणी – वैदयकीय मंडळाचे प्रमाणपत्र
 • आर्थिक सवलत — विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च
 • दुस-या /तिस-या वेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी –
  • विभागप्रमुख – दुस-यांदा
  • शासन – तिस-यांदा 
 • क्षयरोग/ कर्करोग/ कुष्ठरोग/ पक्षघात रजा – नियम ७९ व परिशिष्ट – ३
  • निलंबनाधीन कर्मचा-यास वरीलप्रमाणे अनुज्ञेय.
  • रजेसाठी तषासणी — मुंबई – जी.टी. / जे .जे. रुग्णालय
  • अन्यत्र महाराष्ट्रात – जिल्हा शल्य चिकित्सालय किंवा नजीकचे शासकीय रुग्णालय.
  • तपासणी खर्च आकारला जात नाही
 • क्षयरोग/ कर्करोग/ कुष्ठरोग/ पक्षघात रजा – नियब ७९ व परिशिष्ट -३
  • ही रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम परिशिष्ट -इ मध्ये नमूद करण्यात आले आहेत.
  • नियम : १ व्याप्ती
   • रोजंदारी व अंशकालीन कर्मचारी वगळून सर्व कर्मचा-यांना लागू आहेत.
   • स्थायी – सर्व सवलती अनूज्ञेय
   • अस्थायी –
    • तीन वर्षाची सेवा — सवलती अनुज्ञेय
   • २ ते ३ वर्ष सेवा – आर्थिक व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा सोडून
   • एक वर्षापेक्षा कमी सेवा — कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
   • इतर सवलती.
   • (शासकीय इस्पितळातील मोफत उपचार सोडून) 

किरकोळ रजा

 • रजेचा प्रकार नाही. पूर्व परवानगी आवश्यक.
 • कर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.
 • कॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय,
 • सार्वजनिक सुट्टीस जोडून सलग ७ दिवसांपेक्षा जास्त काळ घेता येत नाही.
 • सेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे.
 • शासन निर्णय वित्त विभाग
  • १.) एलव्हिइ १४८२ /सीआर ९०/एसईआर ९. दि. २४/०३/१९८२
  • २.) ने.मि.र./प्र.क्र.५२/९८ सेवा – ९. दि. २१/१२/१९९८. 

मोबदला सुट्टी

निम्नश्रेणी कर्मचा-यांनी सार्वजनिक सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबदला सुट्टी.

 • एका कॅलेंडर वर्षात एका वेळी तींन पेक्षा जास्त साठवता येत नाही.
 • पुढील कॅलेंडर वर्षात उपयोगात आणता येणार नाही.
 • जादा कामाचा आर्थिक फायदा दिल्यास मोबदला सुट्टी अनुज्ञेय
 • शासन निर्णय साप्रवि/क्र.यी ९३/२३९७ दि.१६/०७/१९६४ 

रजा रोखीकरण – नियम ६५,६८,६९

टीप :- दिं. १/१/२००६ पासून मूळ वेतन म्हणजे वेतनबँड मधील वेतन अधिक (+) ग्रेड वेतन होय. 

अजित रजेचे रोख सममूल्य = ( मूळ वेतन + म. भ. * शिल्लक अजित रजेचे दिवस ) / ३०

 • नियतवयमान / स्वेच्छा / रुग्णता निवृत्ती / सेवेत असताना मृत्यू
 • (३०० दिवसांच्या मर्यादेपर्यंत)
 • राजीनामा दिल्यास शिल्लक रजेपैकी निम्मे जास्तीत शासन वित्त विभाग अधीसुचना दि. २४/६/२०१६ अन्वये राजीनाम्यानंतर शिल्लक अर्जित रजेच्या निम्म्या रजेचे रोखीकरण अट काढून टाकली 

सौजन्य : श्री बाबासाहेब शिंदे , वित्त व लेखा अधिकारी वर्ग -१

सौजन्य : श्री अमोल इखे , लेखाधिकारी , यशदा प्रबोधनी , अमरावती

रजे बाबत एकत्रित शासन आदेश

 4,223 total views,  7 views today

Share This On :

8 thoughts on “नागरी सेवा रजा नियम १९८१”

 1. 24.6.2016
  शासन अनधसूचना क्र.
  अरजा 2015/प्र.क्र. 22/
  सेवा 6
  राजीनामा नदल्यास अर्जजत रजेइतके रजेचे रोखीकरण
  नद.15.01.2001 च्या अनधसूचनेत सुधारणा के ली ( ननयम 68

  adhisuchanechi copy asel tar please dyavi

  Reply
 2. अत्यंत उपयुक्त महिती दिलेली आहे या साठी आपले आभारी आहोत 🙏

  Reply
 3. अर्जित रजेची साठवणूक 300+15 याप्रमाणे कोणत्या शासन निर्णयान्वये करण्यात येते. कृपया कळवावे अत्यंत आवश्यकता आहे.

  Reply
  • महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ नुसार अधिनियम बघावा.

   Reply
 4. गट क साठी वैद्यकिय रजा २९ दिवसकरिता प्रथम उपजिल्हा रुग्णालयात वैदयकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र सादर केले आहे मात्र यावरती मुख्याधिकारी यांना मान्य नाही, त्यांनी मेडिकल बोर्ड आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचे certificate सादर करा असे सांगितले आहे, तर यावरती काय करता येईल.

  Reply

Leave a Comment

error: