गोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत

गोपनीय अहवाल बाबत

 1. शा.नि सामान्य प्रशासन विभाग क्र-सीएफआर.1210/प्र.क्र.47/2010/13, दि.01/11/2011 पाहावा.
 2. शा.नि सामान्य प्रशासन विभाग दि.07/02/18 अन्वये गट ब व त्यापेक्षा वरील अधिकाऱ्यांकरीताचे गोपनीय अहवालचा नमुना नवीन करण्यात आला आहे. तसेच त्यांचे गोपनीय अहवाल ONLINE भरण्यात येणार आहे , तर इतर कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल नमुना देखील बदलण्यात आलेला आहे.
 3. गोपनीय अहवाल कालावधी हा १ एप्रिल ते 31 मार्च असा असतो.
 4. महिन्यापेक्षा कमी कालावधी असल्यास गोपनीय अहवाल न लिहिता प्रमाणपत्र देण्यात येते.
 5. सन 2011 पासून प्रत्येक कर्मचा-याला गोपनीय अहवालाची छायांकित प्रत 30 जुन पर्यंत मिळणे आवश्यक आहे.
 6. जे अधिकारी विहीत मुदतीत गोपनीय अहवाल प्रतिवेदन/पुर्नविलोकन करणार नाहीत , त्यांची माहे जुलैची वेतनवाढ देऊ नये अशी तरतूद शासन निर्णय दि.17/12/2011 मध्ये आहे.
 7. गोपनीय अहवाल प्रतिकुल शे-यांविरुध्द कर्मचा-याने 30 दिवसात नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अपील करणे आवश्यक आहे.
 8. गोपनीय अहवाल हे पदोन्नती, 10/20/30 वर्षाच्या लाभासाठी आवश्यक आहेत.
 9. पदोन्नती करिता गोपनीय अह्वालाबाबतचे निकषाकरिता शा.नि.सा.प्र.वि.दि.1.8.2019 परिशिष्ट 4 कृपया पाहावे

मत्ता व दायित्व विवरणपत्रे बाबत

 1. शा.नि.सामान्य प्रशासन विभाग क्र.वसिअ-1214/प्र.क्र.26/11दि.2/6/2014 नुसार प्रत्येक शासकीय कर्मचा-याने (ड वर्गसोडून) सेवेत लागल्यानंतर दोन महिन्यात किंवा प्रत्येक वर्षामध्ये दिनांक 31 मार्चची स्थिती दर्शविणारे आपले मत्ता व दायित्व विवरणपत्रे प्रपत्र 1,2 व 3 मध्ये दिनांक 31 मे पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
 2. वरील विवरणपत्रे जर विहीत मुदतीत सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानन्यात येईल व अशा गैरवर्तणूकीबद्दल म ना से ( शिस्त व अपील) नियम 1979 नुसार तो कर्मचारी शिस्त विषयक कार्यवाहीस पात्र ठरेल.
 3. मत्ता व दायित्व विवरणपत्रे पदोन्नतीकरीता, 10/20/30 वर्षाच्या लाभाकरिता. गोपनीय अहवालासाठी आवश्यक आहेत.
 4. प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे मत्ता व दायित्व विवरणपत्रे थेट नियुक्ती प्राधिकार्यास सादर करावीत व त्याबाबत आपल्या सध्याच्या कार्यालय प्रमुखास अवगत करावे.
दिनांक विषय
12/09/2013गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत
09/07/2013गोपनीय अहवाल विहित वेळापत्रकानुसार लिहिण्याची जबाबदारी पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची दि. 1 जूलै रोजी देय होणारी वार्षिक वेतनवाढ मंजूर न करण्याबाबत
17/02/2012अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकन करण्यासाठी निश्चित केलेली समयमर्यादा
17/12/2011अखिल भारतीय सेवेतील व राज्य शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाचे प्रतिवेदन व पूर्नविलोकनासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत
01/11/2011शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे -2011
01/08/2003शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालासंदर्भात लोकप्रतिनिधीमार्फत राजकीय दबाव आणल्यास अशा अधिकारी / कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालात त्याबाबतची नोंद घेण्याबाबत..
27/02/2003गट ‘क’ मधील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नस्त्या अदयावत ठेवणेबाबत
27/03/2002गोपनीय अहवालात “अत्युत्कृष्ट” दर्जाचे शेरे नोंदविण्यासंबंधी
01/02/1996 गोपनीय अहवाल लिहणे व जतन करणे -1996
02/06/2014मत्ता व दायित्व शासन आदेश व विवरण पत्र नमुना -2014
07/02/2018गोपनीय अहवाल शासन आदेश व नमुना -2018

सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन

 3,860 total views,  3 views today

Share This On :

Leave a Comment

error: