नगर परिषद कर्मचारी बाबत

रोजंदारी कर्मचारी नेमणुका बाबत

अ ) दि १०/०३/१९९३ पूर्वीचे रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्या बाबत प्रादेशिक संचालकांना अधिकार प्रदान करण्यात आलेत.

ब ) सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. २५/०८/२००५ व त्यात नमुद मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेवून दि. १०/०३/१९९३ ते दि. २७/०३/२००० या कालावधीतील नगर परिषद आस्थापनेवरील कार्यरत असलेले अनियमित रोजंदारी कर्मचाऱ्यांना नगर परिषद आस्थापनेवर नियमित सेवेत समावेशन करुन घेणे शक्य होणार नाही असे शासन नगर विकास विभागाने आपले पत्र दि. ३०/११/२००५ अन्वये संचालनालयास कळविले आहे.
क ) दि. १०/०३/१९९३ पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून नगर परिषद नियमित सेवेत (अस्थायी आस्थापनेवर) सामावून घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषदांनी सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनियमित नियुक्त्या नियमानुकुल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अशा रोजंदारी अनियमित कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ति अनुज्ञेय नाही. याबाबत संचालनालय पत्र क्र.नप्रसई-१००४/प्र.क्र.१४०४५, दि. १६/०२/२००४ सर्व नगरपरिषदांना कळविण्यात आलेले आहे.

सफाई कर्मचा-यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देणे बाबत

अ ) लाड कमिटीच्या शिफारसी नुसार वारसास वारसा हक्काने नियुक्ती मिळणे कामी संचालनालयाने तसेच शासनाने वेळोवेळी स्थायी निर्देश तसेच परिपत्रके निर्गमित केलेली आहेत. शासन, नगर विकास विभाग परिपत्रक दि. ११/०८/२००६ नुसार वारसा हक्काच्या रिक्त जागा भरण्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादची अट काढून टाकली आहे. तसेच वारसा हक्कानुसार सेवेत समाविष्ट करताना वारसदाराच्या पात्रतेनुसार खालील व्यक्ती वारस म्हणून पात्र असतील.

१. पती / पत्नी
२. मुलगा / सून
३. अविवाहित मुलगी
४. विधवा / घटस्फोटीत मुलगी
५. विधवा / घटस्फोटीत बहीण
६. वरील पैकी कोणताही वारस उपलब्ध नसल्यास त्याचा सांभाळ करण्याची लेखी हमी देणारी जवळची नातेवाईक किंवा नामनिर्दाशत व्यक्ति.

ब ) नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या वारसांना स्थायी अथवा अस्थायी पदावर नियुक्ती देता येईल असे संचालनालयाचे दि.२३/०९/२००५ चे परिपत्रकान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्थायी सफाई कामगाराचे पद निष्कासित होणार नाही. शासन निर्णय , नगर विकास विभाग यांचे दि. १०/०९/२००७ परिपत्रकानुसार वैद्यकिय कारणास्तव सफाई कर्मचारी विकलांग झाल्यास सफाई कर्मचाऱ्यांचे कर्तव्य पार पाडण्यास तो असमर्थ ठरल्यास त्याने २० वर्षे सेवा पूर्ण करणे ही अट जाचक आढळून आली आहे. सदर बाब विचारात घेवून २० वर्षे अर्हताकारी सेवेची अट वगळण्यात आली आहे. शासनाचे दि. १०/०९/२००७ चे परिपत्रकात घेतलेला निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसून परिपत्रकाच्या दिनांकापासून लागू असले बाबत संचालनालयाचे दि. २५/०५/२०१२ चे पत्रान्वये सर्व नगरपरिषदांना कळविले आहे.
क ) वारसा हक्क नियुक्तीमध्ये विलंब टाळण्यासाठी संचालनालयाचे दि. २३/०५/२०१३ चे पत्रान्वये सर्वसमावेशक सूचना निगमित करण्यांत आल्या आहेत.
ड ) लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दि. २६/०२/२०१४ चे शासन परिपत्रकान्वये, सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणी बाबत येणाऱ्या अडचणीचे अनुषंगाने सूचना निर्गमित केल्या आहेत. सदरहू दि. २६/०२/२०१४ चे परिपत्रकाची प्रत विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक यांना पाठविण्यात येवून परिपत्रका प्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना त्यांचे स्तरावरून जिल्हा प्रकल्प अधिकारी व मुख्याधिकारी यांना देण्याबाबत संचालनालयाचे दि. २८/०३/२०१४ च्या पत्रान्वये कळविले आहे.
इ ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून शासनाच्या इतर विभागाच्या (नविवि, साप्रवि, कामगार, आरोग्य इत्यादि ) सहमतीने सर्वसमावेशक धोरण विहित करण्यात येणार आहे.

नगरपरिषद कर्मचारी संबधित शासन निर्णय

 398 total views,  11 views today

Share This On :

Leave a Comment

error: