दलीत्तेतर योजना

प्रस्तावना

महानगरपालिका , नगरपालिका क्षेत्रातील वेगाने वाढणारे नागरीकरण व त्यानुषंगाने उद॒भवणाऱ्या नागरी समस्या, नागरा स्थानिक स्वराज्य संस्थांना सोडविण्यासाठी व शहर सुंदर होण्यासाठी तसेच शहराच्या सुनियोजित विकासासाठी सर्व महानगरपालिका , नगरपरिषदांनी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रयत्न होत असतांन समाजाच्या दुर्बळ घटकातील कुटुंबांचा वास्तव्य असलेल्या वस्त्यांमध्ये नागर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. राज्यामध्ये दलित वस्तीच्या सुधारणेसाठो नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. त्याच धर्तीवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाक्षेत्रात दलीत्तेतर वस्त्यामध्ये सुनियोजित रहिवास व सुसंगत अशी नागरी पायाभूत सुविधा उदा. रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा, मलनि:सारण, दिवाबत्ती इत्यादीची सोय आणि सामाजिक सुविधा (उदा. बालवाडी, समाज मंदिर वगैरे) या सुविधा कालबध्द कार्यक्रम आखुन पुरवणे गरजेचे असल्याने त्यासाठी नागरी भागात दलित्तेतर वस्ती सुधारणा योजना सुरु करण्याची आवश्‍यकता शासनास भासत होती. त्यादृष्टीने राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील दलीतेततर वस्त्यांमध्ये विकास कामांसाठी जिल्हायोजने अंतर्गत ” नागरी दलित्तेतर वस्ती सुधारणा राबविण्या संबंधी शासन पुढील प्रमाणे मार्गदर्शक तत्वे निश्‍चित करीत आहे.

शासन निर्णय :

जिल्हा याजने अंतर्गत “नागरी दलित्तेतर वस्ती सुधारणा योजना” प्रत्येक शहरात राबविण्यात यावी . सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणे होऊन वा योजवेंतगंत घेण्यात येणारी काम नियोजित पध्दतीने पूर्ण करण्याच्या दुष्टीने महानगर पालिका ,नगर परिषदांची खालिल प्रमाणे कायंवाही करावी. 

१) महानगरपालीका / नगरपरिषदा क्षेत्रातील नागरी दलित्तेतर वस्त्यांचे सर्वेक्षण करुन त्यांची यादी करण्यात यावी , तदूनंतर अशा भागातील रस्ते, मोकळ्या जागा व त्या भागासाठी पुरविण्यात आलेल्या नागरी सोयी सुविधा यांची सधस्थिती दर्शविणारा तसेच नागरी सेवाची शासनमान्य मानके विचारात घेता आवश्यक असणा-या नागरी सोयी सुविधांचा नियोजन आराखडा तयार करावा. सदर नियोजन आराखडयात अशा वस्त्यांसाठी आवश्यक पोच रस्ता व अंतर्गत रस्ते तसेच पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलाचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे इतर सामाजिक सुविधा जसे समाजमंदीर, प्राथमिळ शाळा, अंगणवाडी इत्यादी बाबी दर्शविण्यात याव्यात.

२) वर नमुद केलेल्याप्रमाणे प्रत्येक नागरी दलित्तेतर वस्तीत नागरी पायाभुत व सामाजिक सुविधा पुरविण्यासाठी त्या विभागाच्या विकास आराखडयाशी सुसंगत असा नियोजन आराखडा तयार करण्यासाठी आवश्यकता भासल्यास सुयोग्य सल्लागार नैमण्याबाबत विचार करता येईल.

3) सदर नियोजन आराखड्यास संबंधीत महानगरपालिका नगर पालिका सर्व साधारण सभेने मंजूरी देणे आवश्यक राहिल.

४) प्रत्येक नागरी दलितेतर वस्ती मध्ये विकास कामे हाती घेताना त्या वस्तोच्या नियोजन आराखडयानुसारच आवश्यक कामाचा विचार करण्यात यावा.

५) सदर नियोजन आराखड्यानुसार पार पाडावयांच्या रस्ते, गटारे, पाणोपुरवठा इत्यादी विषयक कामंचे अंदाजपत्रक व आराखडे संबंधित अभियंत्याकडून तयार करुन घ्यावेत, तसेच ते सक्षम तांत्रिक अधिकाऱ्याकडून मंजूर करुन घ्यावेत.

६) नियोजन आराखड्यातील कामे राबविताना पाणोपुरवठा व मलनिस्सारणाचो कामे प्राथम्याने हाती घेण्यात यावीत. रस्त्याची कामे घेताना पर्जन्य जल व्यवस्थापनाचा तसेच पथ दिव्यांचा विचार करण्यात यावा

७) काम सुरु करण्यापूर्वी तेथील परिसराची छायाचित्र घेण्यात व काम पूर्ण झाल्या नंतर हि तेथील परिसराची सुधारित छायाचित्रे घेण्यात यावीत. जेणकरुन त्या परिसरामध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधांचे दृश्य परिणाम दिसून येतील. तसेंच सदर ठिकाणा संबंधित काम नागरी दलित्तेतर वस्ती सुधारणा योजनेमधून घेतले असल्याचा फलक लावण्यात वावा.

८) नागरो दलितेतर वस्ती सुधारणा योजनेकरिता संबंधीत जिल्हा नियोजन मंडळाने जिल्हयातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या व त्यांनी सदर आर्थिक वर्षातील प्रस्तावित केलेली कामे विचारात घेऊन वार्षिक योजने अंतर्गत निधीची तरतुद करावी.

१०) जेव्हा जिल्हयातील एकूण नागरी स्थानिक स्वराज्य संस्थापैकी काही नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत जिल्हाधिका-यांकडे सादर ने केल्याने अथवा मागील वर्षातील निधीची उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली नसल्यास जिल्हयासाठी उपलब्ध असलेली तरतूद अधिक वर्षाअखेर शिल्लक राहत असेल, अशा परिस्थिती मध्ये एखाद्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी करण्यात आलेली तरतुद जिल्हयातील इतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील दलित्तेतर वस्त्यांमधील जनतेला सोई सुविधा देण्याकरिता वापरता येईल. 

संबधित शासन निर्णय :

दिनांक विषय
08/11/2010दलित्तेतर योजना
24/03/2021नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेची तत्वे निश्चित करणे बाबत

 3,276 total views,  1 views today

Share This On :

Leave a Comment

error: