प्रस्तावना
केंद्र शासनाने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा, १९९५, दि. ०१.०१.१९९६ पासून लागू केला आहे. सदर कायद्यातील कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अपंगांसाठी किमान ३% निधी राखीव ठेवण्याबाबत शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्र. संकीर्ण-२०१०/प्र.क्र.१४६/२०१०, दिनांक ३०.१०.२०१० अन्वये निदेश देण्यात आले आहेत. सदर ३% निधी नागरी भागातील अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याकरीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्र. संकीर्ण-२०१०/प्र.क्र.१४६/२०१०, दिनांक ३०.१०.२०१० अन्वये अपंग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षण व समान सहभाग कायदा, १९९५ च्या कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अपंगांसाठी राखून ठेवावयाचा ३% निधी पुढील प्रयोजनार्थ खर्च करण्यात यावा:
- १) अपंगांच्या शालेय शिक्षण/ उच्च शिक्षण/ खेळांडूकरीता ( जिल्हास्तर/राज्यस्तर/ राष्ट्रीयस्तर / आतंरराष्ट्रीयस्तर ) शिष्यवृत्ती देण्यात यावी.
- २) उत्पनाच्या अटींवर घरकुलांसाठी अर्थसहाय्य देणे.
- ३) अपंगांच्या मागणीनुसार त्यांना उदारनिर्वाह / व्यवसाय/ साहित्य खरेदी करण्याकरीता निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करावा.
- ४) अपंगांना वैद्यकीय खर्चाकरीता निधी उपलब्ध करावा.
- ५) नागरी वाहतुक व्यवस्थेमध्ये अपंगांकरीता प्रवासात सवलत देणे व याकरीता होणाऱ्या तोट्याची भरपाई करणे.
- ६) शॉपिंग मॉल, मंडया ,इत्यादीमध्ये अपंगांना स्टॉल उभारण्याकरीता अर्थ सहाय्य करणे.
- ७) महत्वाच्या स्थानिक बस स्टॉप/ डेपोमध्ये व्हिलचेअर उपलब्ध करणे.
- ८) सार्वजनिक वाचनालयामध्ये अंध व्यक्तींकरीता ऑडिओ लायब्ररी निर्माण करणे.
- ९) महानगरपालिका/ नगरपालिकेच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थ्यांकरीता सोयीसुविधा उपलब्ध करणे.
- १०) अपंगांच्या क्रिडा, चित्रकला, हस्तकला, इ. स्पर्धा आयोजित करणे.
- ११) अपंगांकरीता व्यायाम शाळा उभारणे.
- १२) अपंगांच्या बचत गटांना अर्थ सहाय्य करणे.
- १३) अपंगाच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे.
- १४) अपंगाकरिता वेगळे भुवन / रात्र निवारा उभारणे.
- १५) अपंगाना पेन्हान योजना सुरु करणे.
- १६) अपंग बेरोजगारांना भत्ता देणे.
- १७) अपंगांच्या कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार / प्रसार करणे.
- १८) उपरोक्त व्यतिरिक्त तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या महत्वाकांक्षी योजना अंमलात आणणे.
- उपरोक्त मार्गदर्शक सूचनानुसार निधीचे वाटप करताना खालील बाबींना प्राधान्य द्यावे:
- १) एखाद्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अपंग व्यक्ती असल्यास त्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार प्राधान्य द्यावे.
- २) ८० ते १००% अपंग व्यक्ती
- ३) ६०ते ८०% अपंग व्यक्ती
- ४) ४०ते ६०% अपंग व्यक्ती
3,737 total views, 5 views today