E-Tender

ई-निविदा

ई-निविदा प्रणालीसाठी विस्तृत मार्गदर्शक उद्देशाने हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे गोंधळ व गैरसोय न होता प्रबोधित, प्रस्तावित,अत्यंत जटिल, स्वयंचलित, वेब-आधारित ई-प्रोक्योरमेंट प्रणाली सहजपणे स्वीकारण्यास सर्व संबंधित विभागांना मदत होईल. दररोजच्या दैनंदिन वापरात आपण महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा https://mahatenders.gov.in  प्रणालीचा उपयोग करू शकतो.

  • शासनाच्या एनआयसीच्या ई-निविदा प्रणालीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक बाबी खालील प्रमाणे आहेत.

ई-प्रोक्योरमेंट (ई निविदा )मध्ये सहभागी होण्याकरता खालील बाबी आवश्यक आहेत . शासनाचे पोर्टल : https://mahatenders.gov.in

  1. ई-प्रोक्युरमेंट सेलची समिती करण्यासाठी नोडल ऑफिसरसह आणि 2 ते 3 सदस्यांची आवश्यकता असते. ही समिती निविदा पुस्तिका तयार करण्यासाठी आणि निविदा नियमांच्या पुनरावृत्ती, कार्यकारी सूचना जारी करणे, अर्थ व कायदेशीर बाबी, अधिसूचना जारी करण्यासह ई-निविदा प्रक्रियेसंबंधी सर्व बाबींवर निर्णय घेईल.
  2. निविदा प्रधिकाराने नोडल ऑफिसर तयार करण्यासाठी अनेक्झर-अ मध्ये माहिती सादर करावी.नोडल ऑफिसरच्या लॉगीनने कार्यालयातील इतर बिड क्रिइटर,बिड ओपनर,बिड इव्यालुअटर ई. लॉगीन तयार करू शकतो.
  3. सर्व भागधारकांसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (साईनिंग आणि एन्क्रिप्शन) प्राप्त करणे अवश्यक आहे.सामान्यत: डीएससी एक ते दोन वर्ष वैध आहे, त्यानंतर त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
  4. भविष्यातील अंमलबजावणीसाठी नोडल ऑफिसर, प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करू शकतो.
  5. एनआयसी च्या ई-निविदा कोऑर्डीनेटर च्या सहाय्याने शासकीय कार्यालयात प्रशिक्षण घेऊ शकतो.यामध्ये शासकीय विभागाचा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाचा वापर उपयोगकर्ता आणि निविदाधारक यांचा समावेश असेल.
  6. निविदा भरणे व ऑनलाईन प्रक्रिया करणे.

 1,155 total views,  3 views today

Share This On :