शासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती

आस्थापना विषयक महत्वाच्या बाबी

शासन सेवेत प्रथम नियुक्ती झाल्यानंतर पूर्तता करावयाच्या बाबी

शासन सेवेत प्रथम नियुक्ती झाल्यानंतर आपल्या नियुक्ती आदेशात नमूद सर्व पुर्तता करणे आवश्यक आहे. त्यातील महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.

 1. जात पडताळणी प्रमाणपत्र :– 6 महिन्यात. ( सा.प्र. वि. शा. नि. दि.12.12.2011,18.5.2013,21.12.2019). महिला कर्मचारी यांच्याबाबतीत त्यांचे जर प्रमाणपत्र लग्नापूर्वीच्या नावाचे असेल तर नावातील बदलाकरीता राजपत्र / सेवापुस्तकातील पहिल्या पानाची छायांकित प्रत जात वैधता प्रमाणपत्र देताना न चुकता सादर करावी.
 2. वैदयकीय तपासणी प्रमाणपत्र :– 6 महिन्यात . (म ना.से. सर्वसाधारण नियम, 1981 मधील नियम 11(1( मधील तरतूद )
 3. चारित्र पडताळणी :– 6 महिन्यात (सा.प्र. वि. शा. नि.दि.९.१.२००९, २८.८.२०१७ व २२.११.२०१७ )
 4. MSCIT परिक्षा :– 2 वर्षात.( सा.प्र. वि. शा. नि.दि.१९.३.२००३ व ४.२.२०१३ )
 5. अनुकंपा नियुक्ती :– शा.नि.सा प्र वि, दि. 21/9/2017 व , दि. 4.8.2018 नुसार विहित संगणक अर्हता व टंकलेखन परीक्षा 2 वर्षात पास होणे आवश्यक आहे.
 6. विभागीय परिक्षा : 2 वर्ष / 4 संधी मध्ये पास होणे आवश्यक आहे. ( सेवा प्रवेश नियमाप्रमाणे )
 7. मराठी/ हिंदी भाषा परीक्षा पास /सुट:– 2/3 वर्षे आत.शा.नि.सामान्य प्रशासन विभाग मभापक्र.1087/14/सीआर- 2/87/20 दि.30/12/1987 व शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.हिमाप-1083/1448/20 दि.17/12/1983 व दि.02/03/1990.
 8. माजी सैनिक/ प्रकल्प ग्रस्त भूकंपग्रस्त/अवंकालीन कर्मचारी/ दिव्यांग कर्मचारी :-यांना टंकलेखन परीक्षा 2 वर्षात 2 संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.आहे. (शा.नि. साप्रवि दि.१३.६.२०१९,४.९.२०१५, १६.११.२०१६)
 9. खेळाड़ उमेदवार : त्यांचे प्रमाणपत्र हे संचालक क्रीडा व युवक सेवा पुणे यांचे कडून प्रमाणित करावे लागते (शा.नि. शालेय शिक्षण दि 30.4.2005)
 10. महिला कार्मचारी :– महिला आरक्षण असेल तर Non creamy layer प्रमाणपत्र आयुक्त महिला व बालविकास यांचे कडून प्रमाणित करावे लागते.( शा. नि.महिला व बालविकास विभाग दि.१०.४.२०१७ व २५.५.२००१)
 11. निष्ठेचे शपथपत्र-कर्मचा-याकडून घेऊन ते साक्षांकित करुन सेवाभिलेख्यात / सेवापुस्तकात चिकटावे. ( शासन परिपत्रक सा.प्र.वि दि 11.9.2014 व 6.10.2015 )

मुळ नियुक्ती साठी अर्हता प्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांविरुध्द कार्यवाही

जे शासकीय कर्मचारी त्यांच्या मूळ नेमणुकीसाठी पात्र नव्हते असे नंतर आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द शासन निर्णय सा प्र वि क्रमांक सीडीआर 1093/1077 प्रक्र 23/93/अकरा दि.12/10/1993 व शासन निर्णय साप्रवि क्रमांक सीडीआर.1-1095/995/प्र.क्र.3/96/अकरा दि.31/10/1996 नुसार कारवाई करणे आवश्यक आहे

शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर करावयाच्या बाबी

 1. राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम नवनियुक्त कर्मचाऱ्याची माहिती सेवार्थप्रणाली मध्ये भरणे आवश्यक आहे. सेवार्थ प्रणाली हि शासकीय कर्मचारी यांचे वेतन काढण्यासाठीची online प्रणाली आहे.
 2. त्याच प्रमाणे, राज्य शासनाच्या DCPS योजनेचा Form भरुन दयावा लागतो. त्यामध्ये Nomination दयावे लागते. त्यानुसार आपणास प्रथम DCPS नंबर मिळतो.तर नंतर NPS चा form भरून दिल्यानंतर NPS नंबर मिळतो .
 3. वरीलप्रमाणे माहिती भरल्यानंतर कर्मचाऱ्यास i) Sevarth ID ii) PRAN No .प्राप्त होईल.
 4. सेवार्थ ID वापरुन आपल्याला सेवार्थप्रणालीतून Payslip काढता येते.त्या कारीताचा User Id हा सेवार्थ ID असतो तर by default password ifms123 असतो.
 5. स्वताचे मूळ व दुय्यम सेवा पुस्तक बनविणे.

स्वग्राम

 1. शासन निर्णय क्र.टी-आर-8/1163/2026, दि.23/10/1963, शा.नि.वित्त विभाग दि. 10/06/2015 अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांस आपले स्वग्राम घोषित करणे आवश्यक आहे.
 2. कर्मचा-याने एक अर्ज करुन त्यासोबत स्वग्राम बाबतचा पुरावा जसे सरपंच तलाठी यांचे प्रमाणपत्र/सात बाराचा उतारा, आधारकार्ड इ.जोडावे.

गट विमा योजना सदस्य (GIS)

 1. प्रत्येक कर्मचा-यांस शासकीय सेवेत लागल्यानंतर शा.नि. वित्त विभाग दि.26/04/1982 नुसार GIS सदस्य करण्यात येते. लागलेल्या महिन्यानंतर माहे डिसेंबरपर्यंत फक्त बचत निधी कपात होते. मात्र 1 जानेवारी पासून बचत निधी व विमा निधी मिळून वर्गणी कपात करण्यात येते.
 2. प्रपत्र 7 (परिच्छेद 19.5 नुसार) प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने GIS नामनिर्देशन भरुन दयावे लागते.
 3. तसेच ज्या वेळेस गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करण्यात येते, त्यावेळेस त्या वाढीव वर्गणीची कोणत्या महिन्यापासून कपात करण्यात येते याची नोंद सेवापुस्तकात घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सेवानिवृत्तीच्या वेळेस गवियो रक्कम मिळण्यास अडचणी येतात / विलंब होतो.
 4. शासन निर्णय वित्त विभाग दि.2/8/2010 नुसार खाली प्रमाणे वर्गणी वेतनातून दरमहा कपात करण्यात येत होती, परंतू शासन निर्णय दि.30/01/2016 अन्वये माहे जानेवरी 2016 पासून गट “क” करीता रु.360/- तर गट “ड” करीता रु.240/- वर्गणी केलेली आहे.
अ.क्र गट दरमहा वर्गणी
रु ९६०
रु ४८०
3पूर्वी १२० आता ३६०
पूर्वी ६० आता २४०

5. GIS ची रक्कम काढण्यासाठी DAT च्या website वरील GIS Calculator चा वापर करावा.

वर्गणी वाढ दिनांक ०१.०५.१९८२०१.०१.१९९००२.०२.१९९८०१.०१.२००२०१.०१.२०१००१.०१.२०१६
वर्ग १८०१२०१२०४८०९६०बदल नाही
वर्ग २४०६०६०२४०४८०बदल नाही
वर्ग 3२०३०३०६०१२०३६०
वर्ग ४१०१५१५३०६०२४०

कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना

 1. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना ही वित्त विभागाच्या दि. 04/02/2016 च्या शासन निर्णयान्वये दि.01/04/2016 पासून सुरु करण्यात आली असुन गट अ ते ड गटाच्या सर्व कर्मचाऱ्याकरिता राशीभूत विमा रक्कम रु.10 लाख आहे.
 2. या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी माहे फेब्रुवारी देय मार्च महिन्याच्या वेतनातुन योजनेची वर्गणी गटवर्ष / एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी कपात करण्यात येते.
 3. परंतु शासन निर्णय वित्त विभाग दि.05/03/2019 नुसार आता कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर प्रथमत: प्रत्यक्ष वेतन आहरित करण्यात येईल त्या वेतन देयकातुनच योजनेची वर्गणी वसुल करण्यात येईल. ज्या महिन्यात प्रथम वेतन देयक आहरित करण्यात येईल, त्यापुढील महिन्याच्या 1 तारखेपासुन सदर कर्मचाऱ्यांस योजना लागू राहील.याप्रकरणी योजनेचा कालावधी त्या कर्मचाऱ्याकरिता योजना लागु झाल्यापासुन ते येणाऱ्या 31 मार्च पर्यत असेल प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेरीस सेवा निवृत्तीसाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदरची योजना लागू राहणार नाही.
 4. शासन निर्णय वित्त विभाग दि.04/02/2016 मधील जोडपत्र 4 नुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने नामनिर्देशन भरुन देणे आवश्यक आहे.

कुटुंब प्रमाणपत्र

 1. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 नियम 116 (14) मधील विहित नमुन्यात कुटुंब प्रमाणपत्र प्रत्येक कर्मचा-यास सादर करावे लागते.
 2. खालील बाबींकरीता कुटुंब प्रमाणपत्र आवश्यक आहे. • वैदयकीय खर्च प्रतिपूर्ती , • भविष्य निर्वाह निधी , • स्वग्राम /महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत , • प्रवास भत्ता / बदली अनुदान इ.
 3. वैदयकीय खर्चाबाबत स्त्री कर्मचा-याने जर सासु सासरे ऐवजी आई-वडील यांची निवड केली असेल तर तसे प्रमाणपत्र सेवा पुस्तकात नोंदविणे आवश्यक आहे.
 4. शासन अधिसूचना क्र. एमआरव्ही-2000/प्र.क्र.(17/2000)/बारा, दि. 28/3/2005 नुसार आता नव्याने नियुक्त झालेल्या प्रत्येक कर्मचारी यांस छोटे कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

विविध नामनिर्देशन देणे बाबत

सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ वेळेवर मिळण्यासाठी खालील बाबींकरीता नामनिर्देशने आवश्यक आहेत.

 1. निवृत्तीवेतन
 2. सेवा उपदान
 3. भविष्य निर्वाह निधी
 4. गट विमा योजना
 5. अपघात विमा योजना
 6. NPS( राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना)
 7. कुटुंब प्रमाणपत्र

तसेच वरील नामनिर्देशने वेळोवेळी अद्यावत करावीत व त्याची एक प्रत नेहमी स्वत कडे ठेवावी.

 5,173 total views,  3 views today

Share This On :
error: