प्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१

नागरी सेवा (रजा) नियम प्रश्नोत्तरे

खर्ची पडणाऱ्या रजा व खर्ची न पडणाऱ्या रजा (विशेष रजा) असे दोन प्रकार ढोबळ मानाने पडतात. त्यामधील खर्ची पडणाऱ्या रजा खालीलप्रमाणे आहेत . खर्ची पडणाऱ्या रजा : १. अर्जित रजा ५० २. अर्थवेतनी रजा ६० ३. परिवितीत रजा ६१ ४. अनर्जिंत रजा ६२ ५. असाधारण रजा ६३ खर्ची न पडणाऱ्या रजा : १. प्रसूती/गर्भपात रजा - ७४ २. विशेष विकलांगता रजा - ७५ ३. अपघाती रजा - ७६ ४. खलाशांची रजा - ७८ ५. रुग्णालयीन रजा - ७७ ६. अध्ययन रजा - ८० ७. क्षयरोग/कर्करोग/कुष्ठरोग - ७९
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम १० अन्वये १) रजा हक्‍क म्हणून मागता येत नाही. २) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारू शकतो. ३) रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकार्‍यास कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येत नाही.
नियम १४ : अन्वये कर्मचारी सेवेत असताना त्याच्या विनंतीवरून भूतलक्षी प्रभावाने एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेत परिवर्तन करता येते. मात्र त्यावेळी तशी रजा अनुज्ञेय असली पाहिजे. नियम ६३ (६) : नुसार अनुपस्थितीचा कालावथी भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेत परावतींत करता येते. नियम १६ : अन्वये कोणत्याही प्रकारची रजा सतत ५ वर्षाहून अधिक कालावधी करीता मंजूर करता येत नाही व रजेच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसाय सक्षम प्राथिकाऱ्याच्या पूर्व मंजूरीशिवाय स्विकारता येत नाही.
नियम ४० : अन्वये राजपत्रित कर्मचाऱ्यास शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्याच्या वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकिय कारणास्तव रजा मंजूर करता येते. अराजपत्रित कर्मचाऱ्यांना नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीच्या वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे वैद्यकिय रजा मंजूर करता येते. नियम ४१ : नुसार रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याला स्वेच्छा निर्णयानुसार दुसरे वैद्यकिय मत घेता येते. नियम ४७ : नुसार वैद्यकिय कारणास्तव रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने वैद्यकिय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्याला कामावर रुजू करून घेता येत नाही. नियम ४८ : नुसार रजा संपल्यानंतर कामावर अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करता येते. नियम ४९ : नुसार रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजू होण्याचा दिवस या दरम्यानचा संपूर्ण कालावधी (रविवार व सुट्ट्या धरून) अनुपस्थितीचा काळ म्हणून धरण्यात येतो.
ही रजा वैद्यकिय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अथीन राहून मंजूर केली जाते. १. कर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची खात्री पटली तर. २. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते. ३. दुप्पट दिवस अर्थवेतनी रजेच्या खाती खर्ची टाकली जाते. ४. कर्मचारी सेवेत परत न अल्यास या रजेचे रूपांतर अर्थवेतनी रजेत होऊन अतिप्रदानाची रक्‍कम वसूल केली जाते. अर्थवेतनी रजा दुप्पट खर्ची टाकून मंजूर केली जाते तिला परिवर्तीत रजा म्हणतात. ही रजा मंजूर करताना वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारेच केली जाते. परंतु खालील परिस्थिती त्यास अपवाद आहे. १. प्रसूती रजेला जोडून ६० दिवसांची रजा. २. विपश्यनेसाठी १४ दिवस रजा. ३. लोकहितास्तव उच्चशिक्षण अभ्यासक्रमासाठी ९० दिवस.
अनर्जित रजा म्हणजे रजेचा ' Overdraft ' . म्हणजे कर्मचारी पुढे कामावर हजर होऊन काम करेल या अपक्षेवर त्याच्या नावे मंजूर केलेली रजा होय. म्हणजेच जी रजा ह्या घडीला कर्मचाऱ्याने अजित केलेली नाही ती अनजिंत रजा होय. १. कोणतीही रजा कर्मचाऱ्याच्या खाती शिल्लक नसेल तेव्हा ही रजा मंजूर केली जाते. २. ही रजा अर्थवेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते. ३. संपूर्ण सेवेच्या कालावधीत ३६० दिवसापर्यंतही रजा मंजूर करता वेते. ४. एकावेळी वैद्यकिय प्रमाणपत्राखीीज ९० दिवस व वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे १८० दिवस ही रजा मंजूर करता येते. ५. ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यासच मंजूर करता येते. ६. ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसूली केली जाते. ७. ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्थवेतनी रजा अर्जित होते त्या रजेमथून अनर्जित रजा वजा करण्यत येते.
कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तर असाधारण रजा मंजूर करतात. म.ना.से. रजा नियम १९८१ मधील नियम ६३ अन्वये ही रजा एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या खाती रजा शिल्लक असतानाही मागणी केली तर त्याला ही रजा मंजूर केली जाते. ही रजा फक्त सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यासच मंजूर करतात. जास्तीत जास्त ५ वर्षापर्यंत ही रजा मंजूर करता येते. अस्थायी कर्मचाऱ्यांना ही रजा खालील मर्यादेपर्यंत मंजूर करता येते. १. कोणताही कर्मचारी - वैद्यकिय प्रमाणपत्राशिवाय ३ महिने. २. १ वर्षाच्या सेवेनंतर - वैद्यकिय प्रमापणदाच्या आधारे ६ महिने. ३. १ वर्षाच्या सेवेनंतर - कर्करोग व मानसिक रोगाच्या कारणास्तव १२ महिन्यापर्यंत. ४. २ वर्षाच्या सेवेनंतर - क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी १८ महिन्यापर्यंत. ५. ७ वर्षाच्या सेवेनंतर - वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे १२ महिने. ६. ३ वर्षांच्या सेवेनंतर लोकहितार्थ उच्चशिक्षणासाठी २४ महिन्यापर्यंत.
शासन निर्णय दि. १५/१/२०१६ अन्वये स्थायी आणि अस्थायी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचे पूर्ण वेतन अनुज्ञेय आहे. सदरची रजा मंजूर करताना दोन पेक्षा कमी हयात मुले असावीत ही पूर्वशर्त आहे. महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस पूर्ण वेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते. अस्थायी महिला कर्मचाऱ्यांकडून सेवा समाप्तीनंतर दोन वर्षे सेवा करण्याची हमीपत्र लिहून घ्यावे लागते. या रजेस जोडून ६० दिवसांची परावतींत रजा व अनर्जित रजा किंवा अनुज्ञेय रजा धरून १ वर्षापर्यंत ही मंजूर करता येईल. (शा.नि.दि.२८/७/९५ अन्वये). शा. नि. दि. २१/९/२०१६ अन्वये विकलांग अपत्य असल्यास महिला कर्मचारी व पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत ७३० दिवस विशेष रजा अनुज्ञेय आहे. शासन निर्णय वित्त विभाग/क्रमांक अरजा/२४६५/२६ सेवा-९ दिनांक२६/१०/१९९८ अन्वये दत्तक घेतलेले मूल १ वर्षाचे आत असल्यास १८० दिवस पूर्ण वेतनी रजा मंजूर करता येते. १ वर्षाचेपेक्षा जास्त वयाचे असल्यास ९० दिवसांची पूर्ण वेतनी रजा मंजूर करता येईल. स्वत:चे एक अपत्य असतानाही दत्तक मूल घेता येईल.
म.ना.से. रजा नियम १९८१ मधील नियम ७४ अन्वये संपूर्ण सेवेच्या कालावथीत ४५ दिवस ही रजा मंजूर करता वेते. ही रजा एकाचवेळी किंवा टप्प्या टप्प्याने कितीही वेळा घेता येईल. ही रजा मंजूरीसाठी कोणतीही अट नाही.
म. ना. से. रजा नियम १९८१ मधील नियम ६१ अन्वये १४ दिवसांपर्यंत विपश्यनेसाठी रजा मंजूर करता येते. सदरची रजा तीन वर्षांतून एकदा घेता येते. संपूर्ण सेवा कालावथीत ६ वेळा ही रजा घेता येते. ही रजा अर्थवेतनी रजेच्या स्वरूपात दुप्पट खर्ची टाकून मंजूर केला जाते.
म. ना. से. रजा नियम १९८१ मधील नियम ७९ अन्वये ही रजा मंजूर करता येते. कर्मचाऱ्याच्या खात्यावरील सर्व रजा संपल्यानंतर ही क्षयरोग रजा पहिले १२ महिने पूर्ण वेतनी रजा कार्यालय प्रमुख मंजूर करतो. त्यानंतर पुढील १२ महिने विनावेतन असाधारण रजा विभाग प्रमुख मंजूर करतील व त्यानंतरचे पुढील १२ महिन्यांची रजा विनावेतन शासन मंजूर करतील. ही रजा सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना देय आहे. रोजंदारी / अंशकालीन कर्मचाऱ्यांना हा नियम लागू नाही.
अस्थायी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात खालीलप्रमाणे सवलती अनुज्ञेय आहेत. ज्या अस्थायी कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा झालेली आहे त्यांना सवलती अनुज्ञेय आहेत. १ ते ३ वर्षापर्यंत सेवा झालेल्या कर्मचाऱयांना आर्थिक व पूर्णवेतनी क्षयरोग रजा सोडून इतर सवलती अनुज्ञेय आहेत. १ वर्षा पेक्षा कमी सेवा झालेल्यांसाठी कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही. शासकीय इस्पितळातील मोफत उपचार अनुज्ञेय आहेत. निलंबनाधीन कर्मचाऱ्यास ही रजा अनुज्ञेय आहे.
म. ना. से. रजा नियम १९८१ मथील नियम ८० अन्वये अध्ययन रजा मंजूर केली जाते. सदर रजा मंजूरीसाठी कर्मचाऱ्यांची सेवा कमीत कमी ५ वर्ष झालेली पाहिजे. कर्तव्यक्षेत्राशी संबंधित असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठ्यक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठीच ही रजा मंजूर करता येते. रजा संपल्यावर कामावर परत येणे आवश्यक आहे. कमीत कमी ३ वर्ष तरी सेवा अध्ययनानंतर शिल्लक असली पाहिजे. ही रजा हक्क म्हणून मागता येत नाही. एकाच व्यक्‍तीला वारंवार ही रजा मंजूर करता येत नाही.

 1,393 total views,  2 views today

Share This On :

4 thoughts on “प्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१”

Leave a Comment

error: