वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती

पार्श्वभूमी

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचे नियम महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय देखभाल ) नियम १९६१ अन्वये व त्यानंतर त्यात केलेल्या सुधारणा नुसार विहित केलेले आहेत. सदर नियमान्वये
अ) रुग्ण म्हणजे :
१. शासकीय कर्मचारी किंवा त्याच्या कुटंबातील कोणतीही व्यक्ती.
२. रजेवर किंवा निलंबित असलेले शासकीय कर्मचारी.
३. पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असलेला कायम अथवा तात्पूरता शासकीय कर्मचारी.
शासकीय कर्मचाऱ्याची एक वर्षापेक्षा जास्त सेवा होणे आवश्यक आहे .
ब) कुटुंब म्हणजे :
१. शासकीय कर्मचाऱ्याची पती / पत्नी
२. शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेली औरस मुले / सावत्र मुले /कायदेशीर दत्तक घेतलेली मुले
३. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील ( निवृत्ती वेतन मुळ वेतनाच्या रुपये ३५०० /- सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि.११.११.२०११ )
(महिला कर्मचाऱ्याला तिच्या आई-वडीलांची किंवा सासु -सासऱ्याची निवड करता येईल.)
४. शासकीय कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेला १८ वर्षाखालील भाऊ / अविवाहित बहिण व घटस्फोटातील बहिणी (वय लक्षात न घेता.)
क) कुटुंबाची संख्या :

१. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक २०/११/२००० पासून (लागू दिनांक ०१/०५/२००१) शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकिय लाभासाठी दोन हयात अपत्याइतके आपले कुटुंब मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.

२. ०१ मे २००१ नंतर त्यांच्या कुटुंबातील अपत्यांची संख्या दोन पेक्षा जास्त झाल्यास आई-वडीलांना व सदर मुलाला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मिळण्याचा हक्क राहणार नाही.

३. मात्र पहिल्या दोन मुलांना वैद्यकीय सोयी मिळण्याचा हक्क राहिल तसेच जर सदर कुटुंबाने त्यानंतर सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्याकडून निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास आई-वडीलांना वैद्यकीय सवलती मिळण्याचा हक्क पुन्हा राहील. मात्र तिसऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना अशा सवलती
मिळणार नाहीत.

४. सदरचाच नियम तीन हयात मुलांच्या बाबतीमध्ये १/५/२००१ पूर्वी लागू राहील.

शासन अधिसूचना क्र. एम्आरव्ही-2000 / प्र क्र १७/2000/बारा दि. २८/३/२००५ नुसार शासकीय सेवेत लागताना सध्या छोटे कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 

वैद्यकिय अग्रिम

शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दि.१०/२/२०१६ अन्वये सध्या

१. हृदय शस्त्रक्रियेची प्रकरणे
२. हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
३. अन्जोप्लास्टी शस्रक्रिया
४. मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया
५. कर्करोग
या पाच गंभीर आजारांकरीता रु.१,५०,०००/- इतके वैद्यकिय अग्निम विभाग प्रमुखांना मंजूर करता येते.
वैद्यकिय अग्रिम मंजूर करताना खालील अटी व शर्ती आहेत.
१.सदरचे अग्रिम हे फक्त ५ गंभीर आजारांकरीता झासकीय अथवा सदर आजारांकरीता शासनमान्य खाजगी रुग्णालयांकरीताच मंजूर करता येते.
२. कर्मचारी जर अस्थायी असेल तर त्याने दोन स्थायी कर्मचाऱ्यांचे जामीन देणे आवश्यक आहे. तसेच सोबत कुटुंब प्रमाणपत्र जोडावे.
३. अग्रिमासोबत रुग्णालयाचे शस्त्रक्रियेचा दिनांक व शस्त्रक्रियेकरीता संभाव्य खर्च दर्शविणारे पत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच अग्रिमाचा धनादेश संबंधित रुग्णालयाच्या नावानेच देणे आवश्यक आहे.
४.सदरचे अग्रिम हे संबंधित कर्मचाऱ्यास शस्त्रक्रिये पुर्वी जास्तीत १५ दिवस आधी देता येते.
५. ज्या कारणासाठी अग्रिम मंजूर करण्यात आले आहे, त्याच कारणासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.
६. अग्रिम मंजूर झाल्यापासून ६ महिन्यांत त्याचे समायोजन होणे आवश्यक आहे, अन्यथा अग्रिमाची वसुली घरबांधणी अग्निमासंबंधीच्या व्याजदराने करण्यात येईल.

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयक मंजुरी अधिकार

अ.क्ररुग्णालय प्रकार प्राधिकृत अधिकारी अधिकार मर्यादा
शासकीय रुग्णालय बाह्य रुग्ण उपचार कार्यालय प्रमुख पूर्ण अधिकार
शासकीय रुग्णालय आंतर रुग्ण उपचारकार्यालय प्रमुखपूर्ण अधिकार
खाजगी रुग्णालय विभाग प्रमुख रु 3,००,०००/-
खाजगी रुग्णालयप्रशासकीय प्रमुख रु 3,००,००० वरील
वैद्यकीय अग्रिम कार्यालय प्रमुखरु १,५०,०००/-

वैद्यकीय देयकाचे प्रकार

अ.क्र रुग्णालय प्रकार उपचार घेतल्याचा प्रकार
शासकीय रुग्णालय उपचार बाह्य रुग्ण उपचार
आंतर रुग्ण उपचार
खाजगी रुग्णालय उपचार शासनमान्य खाजगी रुग्णालय ( पाच गंभीर आजार व इतर विशेष मान्य आजार )
खाजगी रुग्णालय ( २७ गंभीर आजार )
3वैद्यकीय अग्रिम उपचार देयक अग्रिम देयक
अग्रिम समायोजन देयक
विशीष्ट आजार वैद्यकीय खर्च देयक मधुमेह , डायलेसीस इत्यादी

वैद्यकीय अग्रिम वाढ

अ.क्र वर्ष अधिकार मर्यादा शासन निर्णय गंभीर आजाराची संख्या
१९८५रु ४५,०००/-२१/०८/१९८५चार
१९९९रु ७५,०००/-२१/०८/१९९९पाच
3२०००रु १,००,०००/-०४/०६/२०००पाच
२००६रु १,१५,०००/-१०/०२/२००६पाच

देय रक्कम

अ.क्र खर्चाचा तपशील शासकीय रुग्णालय शासन मान्य रुग्णालय खाजगी रुग्णालय
रुग्णालयीन खर्च १००%१००%९०%
वास्तव्याचा खर्च १००%खालील तक्त्याप्रमाणे खालील तक्त्याप्रमाणे
बाहेरून खरेदी केलेली औषधी १००%१००%९०%
बाहेर केलेल्या तपासणी जसे ( क्ष किरण , रक्त तपासणी इत्यादी )१००%१००%९०%

वास्तव्याचा खर्च

अ.क्र खाजगी रुग्णालयातील वास्तव्याचा तपशील खाजगी रुग्णालय
जनरल वार्ड ( सर्व सामान्य वार्ड )प्रत्यक्ष खर्चाच्या ९५ %
सर्व सामान्य कक्षाचा बाजूचा बाथरूम नसलेला प्रत्यक्ष खर्चाच्या ९० %
बाथरूम सह स्वतंत्र कक्ष प्रत्यक्ष खर्चाच्या ७५ %
बाथरूम सह डबल बेडेड कक्ष प्रत्यक्ष खर्चाच्या ७५ %
बाथरूम सह वातानुकूलित कक्ष प्रत्यक्ष खर्चाच्या ७५ %
अतिदक्षता कक्ष ( ICU )१०० %

वैद्यकिय खर्च प्रतिपूर्तीचे देयक सादर करताना खालील बाबी प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे

१. परिशिष्ट १ पुर्ण भरावे.

२. नमुना क व ड वरील सर्व रकाने व्यवस्थित भरुन दोन्ही मधील रकमा जुळणे आवश्यक आहे.

३. नमुना ड वर रुग्णालयाचा नोंदणी क्रमांक न चुकता नमुद करावा.

४. औषधांची प्रमाणके संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याकडुन प्रमाणित करुन घ्यावीत.

५. देयकासोबत सर्व चाचणी अहवाल जोडावेत.

६. ज्या कालावधीत रुग्ण आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल असेल, त्याच कालावधीतील औषधे / चाचण्या / उपकरणे यांच्या रकमा देयकात घेण्यात याव्यात.

७. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर देयक सादर केल्यास कर्मचाऱ्याने देयक कार्यालयास सादर केल्यानंतर देयकाच्या झालेल्या प्रवासाबद्दत प्रत्येक टप्पेनिहाय नमूद करावे.

८. ज्या लेखाशिर्षाखाली देयक खर्ची टाकावयाचे आहे, त्याचा संपूर्ण तपशिल प्रस्तावात न चुकता नमूद करावा.

९. वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकाकरीता www.mahakosh.in या संकेतस्थळावरील employee cornor – useful forms या लिंकवरील दिलेल्या विवरणपत्रातच देयक सादर करावे.

१०. काही कर्मचाऱ्यांकडुन बऱ्याचवेळा जोडुन असलेल्या कालावधीचे देयक सादर करताना एका दिवासाचा वास्तव्याचा खर्च दोन्ही देयकात आकारला जातो, तो एकाच देयकात नमूद करावा.

११. वैद्यकिय अग्रिम देयके बऱ्याच वेळा अचानक सादर करावी लागतात, अशा वेळेस जर संचालनालयातील संबंधितांना पुर्व कल्पना दिल्यास त्याप्रमाणे देयक तातडीने मंजूर करण्यात मदत होईल.

१२. जर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देयकात किरकोळ आक्षेप असल्यास संचालनालयाकडून संबंधितास त्याची पूर्तता करावयास दुरध्वनीद्वारे सांगितले जाते. अशा वेळेस त्याची त्वरीत पूर्तता करावी.

१३. संचालनालयाकडून ज्या वेळेस एखाद्या देयकाबाबत आक्षेप घेतला जातो त्या वेळेस संबंधित कर्मचाऱ्याने सादर केलेल्या खुलाशावर कार्यालय प्रमुखाने (कोषागार अधिकारी / सहसंचालक / अधिदान व लेखा कार्यालय ) स्वत:चे स्पष्ट अभिप्राय देऊनच देयक सादर करणे आवश्यक आहे.

१४. काही ठराविक रुग्णालयामध्ये ठराविक उपचारासाठी पॅकेज ठरवुन दिलेले असतात, अशा वेळेस सदर पॅकेजचा तपशिल देयकाची अचूक परिगणना करण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.

१५. देयके संचालनालयात सादर करताना सोबत वित्त विभाग शासन निर्णय दि.६/९/२०१४ प्रमाणे चेकलिस्ट जोडावी.

१६. जर एखाद्या कर्मचाऱ्यास दि.१/५/२००१ पुर्वीची तीन पेक्षा जास्त मुले असतील तर सोबत निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र जोडण्याची आवश्यक्यता आहे.

१७. ज्या खाजगी रुग्णालयात इंन्टा ऑक्युलर लेन्स बसवली असल्यास त्याची किंमत शासकीय रुग्णालया इतकी सिमित करण्यात यावी.

१८. अधिक माहितीसाठी अधिदान व लेखा अधिकारी कार्यालयात देयके पारीत करतानाची चेकलिस्ट सोबत जोडली आहे. 

विशिष्ट आजारांची खर्च प्रतिपूर्ती

शासकीय कर्मचाऱ्याला काही विशिष्ट आजारांच्या खर्चाची प्रतिपूर्ती खालील प्रमाणे देय ठरविण्यात आलेली आहे.
१. मधुमेह; – रुग्णाला मधुमेह झाल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याकडुन प्रमाणपत्र घ्यावे लागते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुढील औषोधपचारांसाठी प्रत्येक वेळेस नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्यता नाही मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील इतर व्यक्तींना प्रत्येक आजाराच्या वेळेस नवीन प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यक्यता राहील.
२. डायलेसिस :- शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर, मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपुर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसिस करवून घेतल्यास त्यावरील शासकीय अथवा खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविण्यात येत आहे.

वरील रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी जिल्हा स्तरावर उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली तर मुंबई शहरातील प्रकरणांसाठी संचालक, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती डायलेसिस करण्याची आवश्यक्यता व डायलेसिसवर उध्दभवलेला खर्च याची शहानिशा करुन प्रतिपूर्तीच्या रक्कमेची शिफारश करील मात्र सदरची रक्कम ही जसलोक रुग्णालय मुंबई येथे आकारल्या जाणाऱ्या रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही.
३ (अ) – काही विशिष्ट आजाराकरीता शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या दरानेच रकमा देय होतात.
उदा. शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग दि.२८/९/२०१६ अन्वये खाजगी रुग्णालयात कर्करोगावरील उपचार घेतल्यास देय होणाऱ्या रकमा निश्चित करण्यात आलेल्या आहेत
३ (ब) – तर सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र दि.१५/२/२०१६ अन्वये खाजगी रुग्णालयात हृदय रोगाबाबत घेतलेल्या उपचाराबाबत द्यावयाच्या रकमा निश्चित केलेल्या आहेत.
४. शासन मान्य खाजगी रुग्णालयात बाहय रुग्ण म्हणून उपचार घेतल्यास सदर वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देय होत नाही मात्र शासन निर्णय ३१/१/२०१२ अन्वये शासकीय कर्मचारी / अधिकारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यावर शासनमान्य रुग्णालयात हृदय विकाराशी संबंधित गंभीर आजारावर (हृदय शस्त्रक्रिया – Heart surgery, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया – bypass surjerty / व अन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाहय रुग्ण (follow up) उपचारावरील ( वैद्यकिय सल्ला शुल्क , औषधे व तपासण्या ) खर्चाची प्रतिपूर्ती रु.१५,०००/- मर्यादेपर्यंत अनुज्ञेय ठरविण्यात आले आहे. 

शासन निर्णय व नुमना

वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती नमुना
वैद्यकीय खर्च प्रतीपूर्ती
वैद्यकीय खर्च हॉस्पिटल यादी

 3,770 total views,  3 views today

Share This On :

8 thoughts on “वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती”

 1. नगर सेवक सभागृहात अपमान करणे व
  सभागृहात दारू पीने बिर्याणी पार्टी केली होती पण आता कारवाई झाली नाही
  १ कायदा सांगा

  नगर सेवक सभागृहात दारू पीने बिर्याणी आणि मित्र कंपनी घेऊन ३०ते४० मित्र घेऊन आला रविवारी सायंकाळी पार्टी केली होती
  कायदा सांगा कारवाई झाली नाही

  Reply
  • नगरपरिषद , नगर पंचायत अधिनियम 1965 मध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे . पुढील कलमानुसार योग्य तो प्रस्ताव करून जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत कार्यवाही केली जाऊ शकते.
   कलम 16 , कलम 42 , कलम 304 तसेच IPC अंतर्गत कलम 153 अ, 505 नुसार देखील कार्यवाही केली जाऊ शकते

   Reply
 2. एखादा कर्मचरी सतत गैरहजर असेल तर त्याला सेवेत परत घेता येतेका

  Reply
 3. कर्करोगावरील उपचारांच्या बाबत किमोथेरपी च्या दिवसानंतर होणारे दुष्परिणाम व त्यावरील चाचण्या व औषधे हे बाह्यरुग्ण अंतर्गत असल्याने प्रमाणित करण्यात येत नाही, वास्तविक कर्करोगाबाबत किमो पेक्षा बाह्यरुग्ण खर्च अवाजवी असतो तो मिळत नाही. तर कर्करोगाबाबत बाह्यरुग्ण खर्च साठी कोणता शासन निर्णय आहे.?

  Reply
 4. परीक्षा वादिन कालावधीमध्ये वैद्यकीय प्रती पुढची मिळते का
  मिळत असेल तर जीआर सांगा कुठला ते

  Reply
 5. शासकीय कर्मचाऱ्यांची एक वर्ष सेवा पूर्ण होणे गरजेचे आहे का जर 1 वर्ष सेवापूर्ण जास्त झाले नसेल तर ….
  त्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही का मिळत असेल तर त्याची माहिती द्या आणि जीआर सांगा

  Reply

Leave a Comment

error: