प्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६

व्याख्या : या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर.
(क) “पिशव्या (कैरी बॅग्ज) * याचा अर्थ, झबला प्लास्टीकच्या पिशव्या या नावाने परिचित असलेल्या व हातात धरण्यास सोयीच्या असलेल्या, वेस्ट टाईप किंवा “ डी” अक्षराच्या आकाराचे छिद्र करून हाताच्या मुठीत धरण्यायोग्य बनविलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या, असा आहे,
(ख) “वस्तू” यामध्ये भाजीपाला, फळे, रसायने, खत, कापड व त्यासारख्या वस्तूंचा समावेश होतो.
(ग) “पात्र ” याचा अर्थ, वस्तू साठविण्यासाठी, वाहून नेण्यासाठी किंवा देण्या-घेण्यासाठी मूळ कच्च्या मालापासून (व्हलिन) बनविलेले किंवा पुनर्चक्रीकरण केलेल्या प्लास्टीकपासून बनविलेले, झाकणाचे किंवा बिगर झाकणाचे लवचिक किंवा टणक पात्र, असा आहे.
(घ) “ अन्नपदार्थ ” याचा अर्थ प्रक्रिया केलेले व शिजवलेले आणि खाण्यासाठी तयार असलेले द्रव, भुकटी, घट्ट किंवा अर्धवट घट्ट (थलथलीत) स्वरूपातील अन्न व अन्नपदार्थ, फास्ट फूड, असा आहे,
(ड) “नमुना” याचा अर्थ, या नियमासोबत जोडलेला नमुना असा आहे,
(च) “ अध्यादेश ” याचा अर्थ, महाराष्ट्र विघटनशील ब अविघटनशील कचरा (नियंत्रण) अध्यादेश, २००६ (२००६ चा महाराष्ट्र अध्यादेश ४) असा आहे.
(छ) “नोंदणी” याचा अर्थ : व्हर्जिन प्लास्टीकपासून किंबा पुनर्चक्रीत प्लास्टीकपासून प्लास्टीकच्या पिशव्यांचे (करी बॅग्ज) व पात्रांचे उत्पादन करणाऱ्या उद्योग धटकाची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलेली नोंदणी, असा आहे.
(ज) “विक्रेता ” याचा अर्थ, जी खाद्यपदार्थाव्यतिरिक्त बस्तूंची व वर्‌ व्याख्या केलेल्या अन्नपदार्थांची प्लास्टीकच्या पिशव्यांमधून (कॅरी ब्रॅग्ज) किंबा त्यात बांधून विक्री करते. अशी -व्यक्‍ती, असा आहे, आणि त्यामध्ये, दुकानदार, उपहारगृहे, किरकोळ विक्रेते. पदपथाबरील विक्रेते, मालसंग्राहक व घाऊक विक्रेता इ.चा समावेश होतो.


अंमलबजावणी प्राधिकरण :

या नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी ,

 • (१) प्लास्टीक पिशव्यांचे (कॅरी बॅग्ज) उत्पादन व पुनर्चक्रीकरण यासंबंधात राज्य व प्रदूषण निवंत्रण मंडळ व राज्य शासनाचा उद्योग विभाग ही. सक्षम प्राधिकरणे असतील.
 • (२) प्लास्टीक पिशव्यांचा (करी बॅग्ज) वापर. विक्री. संग्रह, विलगीकरण. वाहतूक व विल्हेवाट यासंबंधात.
 • (3) संबंधित महानगरपालिका क्षेत्रामध्ये, महानगरपालिका आयुक्त किंवा महानगरपालिका आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला, सहायक महानगरपालिका आयुक्तांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा , नसलेला. इतर कोणताही अधिकारी, सक्षम प्राधिकारी असेल : संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी :
 • (४) कोणत्याही गावाने संबोधल्या जाणा-या स्थानिक प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये, त्या स्थानिक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

४. पुनर्चक्रीकरण (Recycle) केलेल्या प्लास्टीकपासून बनविलेल्या पिशव्यांच्या (कॅरी बॅग्ज) वापरावर बंदी. कोणताही विक्रेता, अन्नपदार्थ साठविण्यासाठी, वाहून नेण्यासाठी. देण्यासाठी किंवा आवेष्टनासाठी पुनर्चक्रीत प्लास्टीकपासून बनविलेल्या पिशव्यांचा (करी बॅग्ज) किंवा पात्रांचा वापर करणार नाही.

५. प्लास्टीकपासून बनविल्या जाणा-या पिशव्यांच्या ( कंरी बॅग्ज ) व पात्रांच्या उत्पादनाच्या शर्ती नियम ४ च्या किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीस, पुढील शर्तीची पूर्तता केल्यास, प्लास्टीकपासून बनविल्या जाणा-या पिशव्यांची (कॅरी बॅग्ज) निर्मिती करता येईल,

 • (एक) व्हर्जिन प्लास्टीकपासून बनविलेल्या पिशव्या (करी बॅग्ज) ह्या नैसर्गिक व पांढऱ्या रंगछटेत असतील.
 • (दोन) पुनचचंक्रीकरण केलेल्या प्लास्टीकपासून बनविलेल्या आणि अन्नपदार्थ साठविण्याच्या व आवेष्टित करण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त, इतर प्रयोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांची (करी बॅग्ज) निर्मिती, ही अन्नपदार्थ, औषधी पदार्थ व पिण्याचे पाणी यांच्या संपर्कात येणा-या प्लास्टीक मध्ये वापरण्यासाठी, भारतीय मानक (आय. एस.) : ९८३३ : १९८१. रंगद्रव्ये व रंगसूचीप्रमाणे, रंगद्रव्यांचा व रंगांचा वापर करून करण्यात येईल.

६. पुनर्चक्रीकरण.— प्लास्टीकच्या पुनर्चक्रीकरणाचे काम भारतीय मानक ब्युरो विनि्देश : आय. एस. : १४५३४ : १९९८. प्लास्टीकच्या पुनर्चक्रीकरण विषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे हाती घेण्यात येईल.

७. चिन्हांकन किंवा सांकेतिक खुणा : (१) प्लास्टीकच्या पिशव्यांचे (कॅरी बॅग्ज) उत्पादक. प्लास्टीकच्या पिशव्यांवर (कंरी बॅग्ज) आणि पत्रांवर, भारतीय मानक ब्युरो यांच्या आय. एस. : १४५३४ : १९९८, प्लास्टीकच्या पुनर्चक्रीकरणविषयक मार्गदर्शक तत्त्व यानुसार चिन्ह किंवा खूण उमटवील अणि पुनर्चक्रीकरण (Recycle) केलेल्या प्लास्टीकपासून बनविलेल्या अंतिम उत्पादनावर. पुनर्चक्रीकरण केलेल्या सामग्रीच्या उपयोगाच्या टक्केवारीच्या निदेशासह * पुनचंक्रीत ** म्हणून चिन्हांकित करील.

(२) ज्यांच्याकडे छपाईची सुविधा नसेल असे प्लास्टीकच्या पिशव्यांचे (कॅरी बॅग्ज) उत्पादक, प्लास्टीकच्या पिशव्या (करी बॅग्ज) “ पुनर्चक्रीत सामग्री ”” पासून किंवा * मूळ कच्च्या मालापासून (व्हर्जिन) बनविलेल्या आहेत किंवा कसे याबाबत प्रत्येक पिशवीवर (कॅरी बॅग्ज) पक्क्या शाईने ठसा उमटवतील.

(३) पोट-नियम (१) किंवा, यथास्थिती, पोट-नियम (२) खालील पूर्ततांखेरीज, प्रत्येक पिशवीवर (कॅरी बॅग्ज) व आवेष्टनावर खालील बाबींदेखील मुद्रित करण्यात किंवा पक्क्या शाईच्या ठशाने उमटवण्यात येतील :

 • (एक) उत्पादकाचे नाव व पत्ता .
 • (दोन) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नोंदणी क्रमांक .
 • (तीन) राज्याच्या उद्योग विभागाचा नोंदणी क्रमांक .
 • (चार) पिशवीची (कॅरी बॅग्ज) जाडी .
 • (पाच) शंभर पिशव्यांच्या (कॅरी बॅग्ज) गठ्याचे वजन.

८. पिशव्यांची (कॅरी बॅग्ज) जाडी :

 • (अ) व्हर्जिन किंवा पुनर्चक्रीत प्लास्टीकपासून बनविलेल्या पिशव्यांची (कॅरी बॅग्ज) किमान जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी आणि आकार ८ * १२ इंचापेक्षा कमी असणार नाही.
 • (ब) कोणतीही व्यक्‍ती , व्हर्जिन किंवा पुनर्चक्रीत प्लास्टीकपासून बनविलेल्या ज्या पिशव्यांचा (करी बॅग्ज) आकार ८ * १२ इंचापेक्षा (२० * ३० सें.मी.पेक्षा) कमी असेल आणि जाडी, पोट-नियम १ मध्ये निर्दिष्ट केलेल्या किमान जाडीपेक्षा कमी असेल अशा: पिशव्यांची (कॅरी बॅग्ज) निर्मिती, -संग्रह, वितरण किंवा विक्री करणार नाही.

९. विवक्षित : व्यक्तींकडून स्ववंनियमन.- नियम ३ मध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींना बाधा न आणता प्लास्टीक उद्योग संघाला, त्यांच्या सदस्य घटकांमार्फत स्वयंनियामक उपाय योजता येतील.

१०. अहवाल : अंमलबजावणी प्राधिकरणे, त्यांना लागू असेल त्यानुसार, नमुना “ अ ” व “ ब ” मध्ये राज्य शासनाला, त्यांचा त्रेमासिक अहवाल सादर करतील. 

 2,011 total views,  5 views today

Share This On :

Leave a Comment

error: