बिंदुनामावली बनवणे व ती अधिकृत करणे याबाबत सविस्तर शासन निर्णय व कार्यप्रणाली बाबत माहिती
- प्रत्येक संवर्गाची सेवाप्रवेश नियमानुसार बिंदूनामावली तयार केली जाते. पदोन्नती/सरळसेवा भरतीकरीता स्वतंत्र बिंदूनामावली आवश्यक आहे. बिंदूनामावली मुळेच आपल्याला जात प्रवर्ग निहाय रिक्त पदांची माहिती कळते. पदोन्नती बिंदूनामावली शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि.१८.१०.१९९७ ,तर सरळसेवा बिंदूनामावली शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि.२९.३.१९९७. व ५.१२.२०१८, 19.12.2018 व 4.7.2019.नुसार ठेवण्यात येते.
- गट अ व ब ची सरळसेवेची बिंदूनामावली सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, कक्षक -16 ब कडून प्रमाणित करण्यात येते. तर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.बीबीसी 2015/प्र.क्र.126/अ/16 ब, दि.05/05/2015 नुसार गट अ (कनिष्ठ) व गट ब ची पदोन्नतीची बिंदु नामावली विभागीय आयुक्त यांच्याकडुन प्रमाणित करण्यात येते.
- गट ब (अराप), क व ड ची बिंदूनामावली त्या विभागातील सहाय्यक आयुक्त (मावक) विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावी.
- बिंदूनामावली चा एक विहित नमुना असून त्यात सेवा प्रवेश नियम, त्यांची प्रश्नावली, विहित प्रपत्रातील माहिती जात पडताळणी प्रमाणपत्रे इ. माहिती भरली जाते .पदोन्नतीची बिंदूनामवली ही भरती वर्ष 1.9 ते 31.8 प्रमाणे तयार केली जाते,तर सरळसेवा सेवेसाठी जानेवारी ते डिसेंबर अशी बिंदूनामावली ठेवावी लागते.
सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन
3,143 total views, 3 views today