सेवा निवृत्ती बाबत

सेवानिवृत्ती बाबात

 1. साधारणपणे पुढील 6 महिन्यात सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांची यादी संचालनालयामार्फत www.mahakosh.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते. त्यात आपले नाव व सेवानिवृत्ती तारीख योग्य असल्याची खात्री करावी.
 2. सेवानिवृत्ती पूर्वीच्या सर्वसाधारणपणे 4 वर्षे कर्मचारी ज्या कार्यालयात आहे / होते त्या कार्यालयाकडून ना येणे ना विभागीय चौकशी प्रमाणपत्र मागितले जाते.
 3. विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरणे, अर्थसंकल्प शाखेकडून कोणतेही अग्रीम ( घर बांधणी / वाहन / संगणक इ. ) वसुली येणे बाकी नाही, इत्यादी माहिती तपासली जाते.
 4. वरील सर्व बाबी तपासल्यानंतर NO DE NO DUES प्रमाणपत्र संचालनालयाकडून देण्यात येते.
 5. सदरचे प्रमाणपत्र निवृत्ती वेतन प्रकरणासोबत जोडावे लागते. तसेच कोषागारात देखील सदरचे प्रमाणपत्र सादर करावे लागते

स्वेच्छा सेवानिवृत्ती बाबत

 1. 7 व्या वेतनआयोगा नुसार 20 वर्षे नियत सेवा झालेले कर्मचारी 90 दिवस किंवा 1 महिना नोटीस देऊन स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊ शकतात.
 2. कार्यरत कार्यालयामार्फत विहित माहिती जसे पुर्ण नाव, जन्मतारीख, शासकीय सेवेतील प्रवेश , आतापर्यंतचा शासकीय सेवेचा संपूर्ण तपशील, स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्याचे कारण, इ. माहितीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 3. स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी NO DE NO DUES प्रमाणपत्रासाठीची आवश्यक माहिती लागते. स्वेच्छा सेवानिवृत्ती ही नेहमी पुढील दिवशी (म.पु.) असते.

सेवा निवृत्तीनंतर चे फायदे

 1. निवृत्तीवेतन
 2. सेवा उपदान (DCRG)
 3. गट विमा योजना (GIS) प्रदान
 4. भविष्य निर्वाह निधी(GPF)
 5. रजा रोखीकरण
 6. निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण
 7. NPS JHT Poroho
 8. स्वग्रामी कायम वास्तव्यासाठी कुटुंब प्रवास भत्ता

वयाच्या 50-55 वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी 30 वर्षाच्या सेवाकालावधी पढे सेवेत राहण्याची पात्रता तपासणे-

 1. महारष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२ च्या नियम १०(४) व नियम ६५ मधील तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्याची वयाच्या 50-55 वर्षापली कडे किंवा अर्हताकारी 30 वर्षाच्या सेवाकालावधी पुढे सेवेत राहण्याची पात्रता आजमवण्यासाठीचे निकष विहित केलेले आहेत.
 2. वरीलप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याची पात्रता आजमवण्यासाठी करावयाचे पुर्नविलोकन राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत वयाची 50 वर्षे पूर्ण किंवा सेवेची 30 वर्ष पूर्ण झाली असेल तर( शासकीय सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी सेवेत आला असेल तर )व इतर राजपत्रित / अराजपत्रित अधिकारी, वर्ग-3 व 4 बाबत वयाची 55 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 50-55 वर्षाचे पूर्नविलोकन केले जाते. ( शासन निर्णय सा. प्र. वि. दि.4.8.2010 दि.8.9.2010 ,10.6.2019 )
 3. त्यासाठी प्रत्येक कॅलेंडर वर्षात दि.1 ऑगस्ट रोजी वयाची ४९/ ५४ वर्षे किवा अहर्ताकरी सेवेची 30 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सुची तयार केली जाते.
 4. 50-55 वर्षाचे पुर्तिवलोकन करण्यासाठी शासन निर्णयनुसार पुर्नविलोकनासाठी एक समिती गठित केली जाते. तसेच अविभवेदनासाठी एक समिती गठित केली जाते.
 5. 50-55 वर्षाचे पुर्भािवलोकन झाल्याशिवाय शक्यतो पदोन्नती करु नये.
 6. 50-55 वर्षाचे पुर्नविलोकन हे गोपनीय अहवालवरुनच केले जाते. त्याकरिता गोपनीय अहवालातील प्रकृतीमान,निर्विवाद सचोटी, चांगल्या पेक्षा कमी नाही असा गो.अ.( 4 पेक्षा कमी गुण ) इ.बाबी पाहिल्या जातात.

सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन

 4,281 total views,  3 views today

Share This On :

Leave a Comment

error: