सेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत

स्थायित्व प्रमाणपत्र बाबत

 1. शासन निर्णय वित्त विभाग क्र.सेनिवे 1007/62/ सेवा-4, दि.04/01/2008 नुसार सेवा निवृत्ती प्रकरणासोबत स्थायित्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
 2. कोणत्याही कर्मचा-यास स्थायित्व प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक आहे.( शासन निर्णय साप्रवि दि.11/09/2014 व 19/09/2017 )
 3. स्थायित्व साठी खालील बाबींची आवश्यकता आहे.
 • कर्मचारी याने त्याच्या नियुक्तीच्या आदेशातील सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
 • जसे वैदयकीय तपासणी चारित्र्य पडताळणी / विभागीय परीक्षा पास इतयादी .
 • कमीत कमी 3 वर्षेसेवा असावी .
 • गोपनीय अहवाल चांगला असावा.
 • परीक्षविधीन कालावधी पूर्ण झाला असावा.

सेवा जेष्ठता बाबत

 1. सर्व संवर्गाची प्रत्येक वर्षी दिनांक 1 जानेवरी रोजीची स्थिती दर्शविणारी तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येते. त्यात मागील वर्षात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत त्या संवर्गात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असतात.
 2. तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्दीनंतर 15 दिवसात सदर यादीवर आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. आक्षेपांच्या विचार करुन 15 फेब्रुवारी पर्यंत अंतिम जेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात येते.
 3. तदर्थ पदोन्नती असले तर जेष्ठता यादीत नाव येत नाही. (शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.एसआरव्ही/2011/प्र.क्र.284/12, दिनांक 21/10/2011, / 28.5.2018/ 13.6.2018 पहावा व जेष्ठता नियम 1982 )
 4. जेष्ठता अबाधित राहण्यासाठी विहित मुदतीत रुजू होणे आवश्यक आहे.
 5. जेष्ठता सुचीतील क्रंमाक / जातप्रवर्ग / जन्मदिनांक/ सेवा निवृत्त दिनांक महत्वाचे आहेत.
 6. जेष्ठता सूची ही पदोन्नतीसाठी , 10/20/30 वर्षाचा लाभ देण्यासाठी , सेवानिवृत्ती , बिंदूनामवाली , इत्यादी साठी महत्वाची असते.

सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन

 4,355 total views,  3 views today

Share This On :

Leave a Comment

error: