शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी

 1. 5 वर्षांचे गोपनीय अहवाल – 5 वर्षांची सरासरी किमान “ ब ” किंवा 4 असावी. (सदरची प्रतवारी हि वर्गनिहाय बदलत असते शा.नि. सा.प्र.वि.दि.1.8.2019)
 2. त्या संवर्गात कमीत कमी 3 वर्षे सेवा होणे आवश्यक आहे.
 3. जात वैधता प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
 4. मत्ता व दायित्व विवरणपत्रे सदर वर्षाची सादर केलेली असावीत.
 5. खालच्या संवर्गाची सदर वर्षाची अंतिम जेष्ठतासूची
 6. विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरणाची माहिती
 7. ज्या संवर्गात पदोन्नती द्यावयाची आहे त्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम
 8. विभागीय परीक्षा पास किंवा सूट, ( वय ५० वर्षे सूट शा. सा. प्र. वि. अधिसुचना.दि. ४.१२.२००८ व दि.१३.१२.२०१२,व १.३.२०१८)
 9. मराठी/ हिंदी भाषा परीक्षा पास /सुट (शा.नि. सा.प्र.वि.दि.1.8.2019)
 10. स्थायित्व प्रमाणपत्र (शा.नि. सा.प्र.वि.दि.1.8.2019)
 11. संशयास्पद सचोटी नसावी (शा.नि. सा.प्र.वि.दि.30.10.2006)
 12. दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर 2 वर्षे जास्त नसावे (शा.नि. सा.प्र.वि.दि.1.8.2019)
 13. MSCIT परीक्षा पास किंवा सूट (५० वर्षे सूट शा. सा. प्र. वि. अधिसुचना.दि.२८.५.२०१८ )
 14. परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झालेला असावा
 15. वय वर्ष 50-55 चे पुर्नविलोकन (शा.नि.सा प्र वि दि.10/6/2019)
 16. वरच्या संवर्गाची बिंदुनामावली
 17. अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करणे (शा.नि. सा.प्र.वि.दि.23.9.2011)

पदोन्नतीसाठी भरती वर्ष हे 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट असे असते.

सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन

 3,961 total views,  1 views today

Share This On :

Leave a Comment

error: