# स्वच्छ भारत मिशन : भाग -१

स्वच्छ भारत मिशन द्वारे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी वैयक्तिक शौचालय उपलब्धता आणि त्याचा वापर या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान 12 हजार रूपये इतके करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण ‘स्वच्छ भारत मिशन’ असे करण्यात आले आहे. या मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने 7 नोव्हेंबर 2014 रोजी घेतला आहे. या बारा हजार रूपयात केंद्राचा हिस्सा 75 टक्के म्हणजे नऊ हजार रुपये तर राज्याचा हिस्सा 25 टक्के म्हणजे तीन हजार रूपये इतका राहणार आहे.

हे मिशन दोन टप्यात होणार असून पहिला टप्पा हा २ ऑक्टोबर २०१५ ते २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राहणार आहे . या पहिल्या टप्प्यात उद्दिष्ट ठरवून देण्यात आलेले आहे.

स्वच्छ भारत मिशन चे पहिला टप्पा उद्दिष्ट मध्ये बाबींचा समावेश होतो.

 • १. हगणदारी मुक्त शहर करणे .
 • २.मनुष्याद्वारे मैला वाहून नेणे याचे उच्चाटन करणे
 • ३. आधुनिक व तांत्रिक पद्धतीने नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन करणे .
 • ४. नागरिकांच्या वागणुकीत व आचारणात बदल करून स्वच्छतेचा अवलंब करणे .
 • ५. नागरिकांना जागृती करून स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य यांचे महत्व पटवून देणे .

तर पहिल्या टप्प्यात वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालील बाबीचा समावेश आहे.

 1. घरघुती शौचालय बांधणे
 2. विशिष्ट समुदाय करिता शौचालय बांधणे
 3. सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधणे
 4. घनकचरा व्यवस्थापन करणे
 5. IEC व जन जागृती करणे
 6. capacity building ( क्षमता विकास ) व कार्यालयीन खर्च

स्वच्छ भारत मिशन करिता अंदाजित खर्च हा रु ६२,००९ कोटी इतका असणार आहे .याकरिता युनिट आधारित व दरडोई उत्पन्न या घटकाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये भारत सरकार द्वारा हिस्सा रु १४,६२३ कोटी आणि राज्य सरकार द्वारा हिस्सा रु ४,८७४ राहणार आहे . तर राहिलेला निधी हा इतर स्त्रोत यामध्ये खाजगी क्षेत्र , स्वच्छ भारत कर , युजर चार्जेस , कंपनी द्वारे सामाजिक निधी , आणि बाजारातून कर्जे रुपात घेण्यात येणार आहे.

सदर योजने करीता अंतरराष्ट्रीय स्तरावरून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेले आहे .यामध्ये पुढील अंतरराष्ट्रीय संस्थांनी सहकार्य दिले आहे.

 1. बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन
 2. ऐशीयन डेव्हलपमेंट बँक ( ADB )
 3. विश्व आरोग्य संघटना ( WHO )
 4. UNICEF
 5. GIZ Deutsche Gesellschaft für Internationale Zusammenarbeit (GIZ) 
 6. UNITED NATION
 7. WORLD BANK
 8. USAID
 9. EBTC ( European business and technology center )

स्त्रोत : स्वच्छ भारत मिशन अर्बन >> क्रमश : भाग २

 3,048 total views,  1 views today

Share This On :

Leave a Comment

error: