सेवापुस्तक बाबत माहिती

सेवा पुस्तक हे शासकीय सेवेचा अत्यन्त महत्त्वाचा अभिलेख आहे . स्वतचे मूळ व दुय्यम सेवापुस्तक प्रत्येकी 6 -7 पुस्तकांचे बायडींग करुन तयार करुन घ्यावे व त्याला पृष्ठ क्रमांक देण्यात यावेत. तसेच आपल्याकडील दुय्यम सेवापुस्तक नेहमी Update ठेवावे व कार्यालय बदल्यानंतर त्यातील सर्व नोंदी प्रमाणित करुन घ्याव्यात.

सेवा पुस्तकातील सर्वसाधारण महत्त्याच्या नोंदी खालील प्रमाणे आहेत.

 1. सेवा पुस्तकातील पहिल्या पानावरील सर्व नोंदी
 2. प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत
 3. वैदयकीय तपासणी अहवालाची नोंद
 4. चारित्र्य पडताळणीची नोंद
 5. जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद.( लागू असल्यास)
 6. स्वग्राम जाहीर केल्याची नोंद
 7. विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
 8. विवाहानंतरच्या नांव बदलाबाबतची नोंद घेणे
 9. संगणक परीक्षा उत्तीर्ण (MSCIT व इतर)
 10. अपघात विमा योजना नामनिर्देशनासह नोंद
 11. मराठी /हिंदी भाषा परीक्षा पास/ सूट देणेबाबतचा आदेश
 12. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सदष्य झाल्याची नोंद, ( क्रमांक व नामनिर्देशन )
 13. अद्ययावत कुटुंबाचे प्रमाणपत्र
 14. गट विमा योजना 1982 चे सभासद झाल्याची आदेशाची नोंद
 15. गट विमा योजना 1982 चे नामनिर्देशन पत्राची नोंद
 16. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण .( लागू असल्यास)
 17. स्थायित्व प्रमाणपत्र नोंद
 18. दरवर्षी माहे सप्टेंबर मध्ये आपल्या दुय्यम सेवा पुस्तकात मूळ सेवापुस्ताकातील सर्व नोदी घेवून ते प्रमाणित करून घ्यावे ,तर माहे मे मध्ये सेवापटाची पडताळणी करावी .(कृपया सेवापुस्ताकासाठी माझी स्वतंत्र नोट्स पहावी )

सौजन्य : डॉ श्री भानुदास जटार , सहाय्यक संचालक , स्थानिक निधी लेखा परीक्षा यांचे संकलन

 1,239 total views,  1 views today

Share This On :

Leave a Comment

error: