कर आकारणी , वसुली व संकलन

Table of Contents :

कर म्हणजे काय ?

 • कर हे नगरपालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे.
 • कर म्हणजे जनतेला सेवा पुरवल्याबद्दल शासनाला देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीयृदृष्ट्या दिली जाणारी रक्‍कम म्हणजेच कर होय.
 • कर म्हणजे सक्तीचे देणे होय. 

करांचे प्रकार

१ ) सक्तीचे कर (कलम 105)

 • अ) एकत्रित मालमत्ता कर
  • सर्वसाधारण कर (संकलित कर)
  • सर्वसाधारण पाणीपट्टी
  • दिवाबत्ती कर
  • सर्वसाधारण स्वच्छता विषयक कर
  • विशेष शौचकूप कर
  • पर्यावरण कर
  • पाणीपुरवठा लाभ कर
  • मलप्रवाह सुविधा लाभकर
  • अम्निशमन कर
 • ब) जाहिरातीवरील कर 

२ ) ऐच्छिक कर (कलम 108) 

 • नगरपालिका क्षेत्रात ठेवलेल्या कुत्र्यावरील कर
 • जलनि:स्सारण कर
 • विशेष शिक्षण कर
 • सर्व वाहने (मोटार वाहन अधिनियम 1939 यात व्याख्या केलेल्या मोटार वाहना व्यतिरिक्त), नावा किंवा वाहतुकीसाठीचे जनावरे
 • वैयक्तिक प्रकरणा नगरपालिकेने पुरविलेल्या पाण्यावरील विशेष पाणीपट्टी.
 • इतर फी व दंड 

मालमत्ता कराची आकारणी कोणत्या मालमत्तावर केली जाते ?

 • नगरपालिकेच्या कार्य क्षेत्रातील सर्व इमारती व मोकळ्या जमिनींवर मालमत्ताकराची आकारणी केली जाते.
 • इमारत– इमारत या संज्ञेत मानसांना राहणेसाठी घर म्हणून किंवा अन्य प्रकारे उपयोगात येत असलेले घर, उपगृह, तबेला, छपरी, झोपडी व इतर परिवेष्टित जागा किंवा संरचना मग ती चिरेबंदी असो किंवा विटा, लाकुड, चिखल, धातु किंवा इतर कोणतीही सामग्री यांची बांधलेली असो यांचा समावेश होतो. तसेच व्हरांडे, कायम बसविलेले चबुतरे, जोते, दाराच्या पाय-या, भिंती (आवाराच्या भिंती धरुन) व कुंपन व तत्सम भाग यांचाही यात समावेश होतो.
 • मोकळ्या जमिन- नगरपालिका हद्दीतील शेतजमीन वगळता इतर मोकळी जागा कर आकारणीस पात्र असेल. 

कर आकारणी (कलम 114)

अ ) करयोग्य मूल्य

मालमत्ता कर आकारला जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे कर योग्य मूल्य ठरविण्यासाठी जे वार्षिक भाडे घेऊन अशा इमारती किंवा जमीन सालोसाल वाजवी रीतीने भाड्याने देता येईल अशी अपेक्षा असेल किंवा जी प्रत्यक्ष भाड्याने दिली असेल त्या पैकी जो अधिक असेल अशा रकमेतून उक्त वार्षिक भाड्याच्या शेकडा 10% इतकी रक्‍कम वजा (घसारा) करण्यात येईल आणि वजा केलेली रक्‍कम म्हणजे कर योग्य मूल्य असेल.
कर योग्यमूल्य > वार्षिक भाडेमूल्य – 10% घसारा (depreciation) 

मालमत्तांवर कर आकारणी कशाप्रकारे केली जाते ?

मालमत्तांवर खालील बाबी विचारात घेऊन आकारणी केली जाते
१. मालमत्तेचा चटईक्षेत्र (कारपेट) क्षेत्रफळ
२. मालमत्तेचा वापराचा प्रकार निवासी/बिगरनिवासी /मोकळ्या जागा /मिश्र
३. मालमत्ता ज्या विभागात आहे त्या विभागातील वार्षिक करयोग्य मूल्याचा चौरस फुट दर.
४. बांधकामाचा प्रकार – RCC / Load Bearing / पत्रा शेड

भाडे मुल्यावर / कर योग्य मुल्यावर आधारीत कर आकारणी

 • जागेचे वार्षीक भाडे – क्षेत्रफळ * दर * 12
 • कर योग्य मुल्य – जागेचे वार्षीक भाडे – 10 टक्के
 • देय कराची रक्‍कम – कर योग्य मुल्य * कराचा दर.

उदा. 1) 50 चौ. मी. चटई क्षेत्र (carpet area) असलेली निवासी इमारत व प्रति चौ. मी. अपेक्षित दर 11 रु. असलेल्या इमारतीचे कर योग्य मूल्य पुढील प्रमाणे.
=> एका महिन्याचे भाडे = carpet area * rate per square meter
= 50 * 11 = 550 रु
एका वर्षाचे भाडे / वार्षिक भाडेमूल्य = एका महिन्याचे भाडे * 12
= 550 * 12 = 6600 रु
कर योग्यमूल्य = वार्षिक भाडेमूल्य – 10% घसारा (depreciation)
= 6600 – 660 = 5940 रु.
उदा. 2) 50 चौ. मी. चटई क्षेत्र (carpet area) असलेली निवासी इमारत व प्रति महिना 800 रु. प्रत्यक्ष भाडे असलेल्या इमारतीचे कर योग्य मूल्य पुढील प्रमाणे.
=> एका वर्षाचे भाडे / वार्षिक भाडेमूल्य = एका महिन्याचे भाडे * 12
= 800 * 12 = 9600 रु.
कर योग्यमूल्य = वार्षिक भाडेमूल्य – 10% घसारा (depreciation)

= 9600 – 960 = 8640 रु.
टीप : उदा. 1) चे कर योग्यमूल्य 5940 रु. व उदा. 2) चे कर योग्यमूल्य 8640 रु. आहे. या दोन्हीमध्ये उदा. 2) चे कर
योग्यमूल्य 8640 रु. हे जास्त असल्याने उदा. 2) नुसार पुढील आकारणी करावी. 

ब ) भांडवली मुल्य

दिनांक 27 एप्रिल 2010 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करुन मिळकती कर आकारणीचा पाया “ मिळकतीची भांडवली किंमत” असा करणेत आला आहे.

भांडवली मुल्य म्हणजे काय ?

व्याख्या :- मालमत्ता कर आकारणी योग्य असलेल्या कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मुल्य निश्चित करतांना मुंबई मुद्रांक शुल्क 1958 अन्वये
तयार केलेले मुंबई मुद्रांक नियम 1995 अन्वये तयार केलेल्या त्या-त्या वेळी अंमलात असलेले ready recknor चे दर व इमारत किंवा जमीनीचे
क्षेत्रफळ, इमारतीचा वापर, इमारतीचे वय यांचा विचार करुन निश्‍चीत केलेले मुल्य होय. 

भांडवली मुल्य निश्चित करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी

1) जमीनीचे स्वरुप व प्रकार आणि इमारतची संरचना.
2) जमीनीचे क्षेत्र किंवा इमारतीचे चटई क्षेत्र.
3) जमीन किंवा इमारतीचा वापर.उदा. निवासी, वाणिज्य, शैक्षणीक संस्थात्मक इ.

4) इमारतीचे वय.
5) मा. कौन्सिल सभा / स्थायी सभेने निश्चित केलेला भारांक किंवा गुणांक.
6) भांडवली मुल्यावरील आकारणी दर 5 वर्षांनी सुधारीत करण्यात यावी
.

भांडवली मुल्याच्या 0.1 टक्क्याहुन कमी नाही आणि 1 टक्क्याहुन अधिक नाही असा सर्व साधारण कर (एकत्रित मालमत्ता कर) निश्चित करण्यात यावा.

1) निवासी प्रयोजनासाठी वापरण्यात येणा-या इमारतींच्या बाबतीत भांडवली मुल्यांवरील कर हा लगत पुर्वीच्या वर्षामध्ये बसविण्यात येण्या जोग्या असलेल्या मालमत्ता कराच्या रक्कमेच्या दुप्पट रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही.

2) अनिवासी प्रयोजनासाठी वापरण्यात येणा-या इमारतींच्या बाबतीत भांडवली मुल्यांवरील कर हा लगत पुर्वीच्या वर्षामध्ये बसविण्यात येण्या जोग्या असलेल्या मालमत्ता कराच्या रक्कमेच्या तिप्पट रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही.

3) भांडवली मुल्याच्या आधारे बसविण्यात आलेला कर हा काहिही झाले तरी अशा सुधारणा केलेल्या वर्षाच्या लगत पुर्वीच्या वर्षामध्ये देय असलेल्या मालमत्ता कराच्या 40 टक्के इतक्या रक्कमेच्या अधिक असणार नाही.

4) 500 चौ.फुटापर्यंतच्या क्षेत्रफळ असलेल्या निवासी इमारती किंवा निवासी गाळ्यांच्या संबंधात लगत पुर्वीच्या वर्षामध्ये बसविलेल्या व देय असलेल्या मालमत्ता कराच्या रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही. 

इघारतीचे भांडवली मुल्य ठरविणे यामध्ये चार प्रमुख घटक असतात,
1) क्षेत्र
2) बांधकामाचा दर (रैडीरेकनर नुसार)
3) स्थळ (रेडी रिकनरमध्ये सर्व नगर भुमापन क्रमांक नमुद केलेले आहे)
4) वय
उदा. बांधकाम क्षेत्र 100 चौ.मि., बांधकामाचा दर रु. 8000 प्रति चौ.मि., इमारतीचे वय 5 वर्षे, त्यामुळे
भांडवली मुल्य = 100 * 2 * 8000 = 8,00,000 /-
घसारा दर निश्चित करतांना शक्‍यतो रेडी रेकनर तक्ता वापरावा. 

जमिनीचे भांडवली मूल्य ठरविणे

न.पा वर्ग आर सी सी इतर पक्के बांधकाम अर्धे पक्के बांधकाम कच्चे बांधकाम
अ वर्ग न.प.६५००५५००३२००१६००
ब, क वर्ग न.प. ६२००५०००२६५०१४००
जमिनीचे भांडवली मूल्य ठरविणे

इमारत घसारा ठरविणे

इमारतीचे पूर्वायुष्य ( वर्षामध्ये )आर सी सी / पक्के बांधकाम घसारा वजावटी नंतर होणारी टक्केवारी अर्धे पक्के व कच्चे बांधकाम घसारा वजावटी नंतर होणारी टक्केवारी
० ते २१००%१००%
२ ते ५९५%९५%
५ ते १०९०%८५%
१० ते २०८०%७५%
२० ते ३०७०%६०%
३० ते ४०६०%४५%
४० ते ५०५०%३०%
इमारत घसारा ठरविणे

भारांकाची निश्चिती करणे

भांडवली मुल्यावर कर आकारणी करतांना गुणांक हा 0.1 टक्के ते 1 टक्के विहीत करण्यात यावा.
उदा. मिळकतीचा विद्यमान सामान्य कर 1500 रुपये, इमारतीचे भांडवली मुल्य 8,00,000/-
भांडवली मुल्यानुसार कर आकारणीचा किमान दर (0.1 टक्का) = 800/-
भांडवली मुल्यानुसार कर आकारणीचा कमाल दर (1 टक्का) = 8000/-
जुन्या कराचा भांडवली किमतीशी गुणोत्तर = 1500 * 100 / 800000 – 0.1875
सुधारणेनुसार,
* निवासी मालमत्तेचा कर जुन्या करापेक्षा जास्तीत जास्त दुप्पट म्हणजे 0.3750 म्हणुन गुणांक हा कमीत कमी 0.1875 व कमाल 0.3750 या मध्ये निश्चित करण्यात यावा.
* अनिवासी मालमत्तेचा कर जुन्या करापेक्षा जास्तीत जास्त तिप्पट म्हणजे 0.5625 म्हणुन गुणांक हा कमीत कमी 0.1875 व कमाल 0.5625 या मध्ये निश्चित करण्यात यावा. 

उदा. मिळकती क्षेत्रफळ 70 चौ.मि., यापैकी 50 चौ.मि. पक्के बांधकाम, सदरचे बांधकाम 25 वर्षापुर्वीचे आहे.
अ) जमिनीचे भांडवली मुल्य = क्षेत्रफळ * रेडी रेकनरचे दर
= 70 * 8800 = 6,16,000/-
ब) इमारतीचे भांडवली मुल्य = बांधकामचे क्षेत्रफळ * रेडी रेकनरचे दर * घसारा
= 580 * 7500 = 3,75,000/-
घसारा = 70 % * 3,75,000 = 2,62,500/-
सबब एकुण भांडवली मुल्य = अ + ब
= 6,16,000 + 7 2,62,500 = 8,78,500

करांचे दर

सर्व साधारण कर

 • सर्वसाधारण कर (संकलित कर)
  • न.प – कमाल दर – किमान दर
  • अ वर्ग न.प. – करयोग्य मुल्याच्या 28 टक्के – करयोग्य मुल्याच्या 23 टक्के
  • ब वर्ग न.प. – करयोग्य मुल्याच्या 27 टक्के – करयोग्य मुल्याच्या 22 टक्के
  • क वर्ग न.प. – करयोग्य मुल्याच्या 26 टक्के – करयोग्य मुल्याच्या 21 टक्के
 • दिवाबत्ती कर- करयोग्य मुल्याच्या 1%
 • पर्यावरण कर – करयोग्य मुल्याच्या 1%
 • अगम्निशमन कर- करयोग्य मुल्याच्या 1%
 • वृक्ष कर – करयोग्य मुल्याच्या 1%
 • जलनि:सारण कर – करयोग्य मुल्याच्या 1%
 • विशेष स्वच्छता कर ( नपाने ठरविलेले एच्छिक दर ) रहिवास मालमत्तांकरीता
 • युजर चार्जेस ( शासनाव्दारे निश्चित )

शिक्षण कर

वार्षिक भाडेमुल्य निवासी प्रयोजन बिगर निवासी प्रयोजन
७५ रु ते १५० रु वार्षिक भाडेमूल्याच्या २ %वार्षिक भाडेमूल्याच्या ४ %
१५१ रु ते ३०० रु वार्षिक भाडेमूल्याच्या ३ %वार्षिक भाडेमूल्याच्या ६ %
३०१ रु ते ३००० रु वार्षिक भाडेमूल्याच्या ४ %वार्षिक भाडेमूल्याच्या ८ %
३००१ रु ते ६००० रु वार्षिक भाडेमूल्याच्या ५ %वार्षिक भाडेमूल्याच्या १० %
रु ६००१ ते अधिक वार्षिक भाडेमूल्याच्या ६ %वार्षिक भाडेमूल्याच्या १२ %

रोजगार हमी कर ( फक्त बिगर निवासी मालमत्ता )

वार्षिक भाडेमुल्य बिगर निवासी प्रयोजन
७५ रु ते १५० रु वार्षिक भाडेमूल्याच्या १ %
१५१ रु ते ३०० रु वार्षिक भाडेमूल्याच्या १.५ %
३०१ रु ते ३००० रु वार्षिक भाडेमूल्याच्या २ %
३००१ रु ते ६००० रु वार्षिक भाडेमूल्याच्या २.५ %
रु ६००१ ते अधिक वार्षिक भाडेमूल्याच्या ३ %

अनधिकृत बांधकाम शास्ती (कलम 189) 

सर्वसाधारण कराच्या ( संकलित करे ) दुप्पट परंतू पुढील प्रकोरे क्षेत्रफळ असलेल्या मालमत्तांना अनधिकृत मालमत्तांना पुढील प्रमाणे सूट असेल. बिगरनिवासी मालमत्तांना कुठल्याही प्रकारची सूट असणार नाही.

१) ६०० चौ. फुटापर्यंतचे निवासी बांधकाम – शास्तीची आकारणी करण्यात येऊ नये.
२) ६०१ ते १००० चौ. फुटापर्यंतचे निवासी बांधकाम – प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या ५०% दराने शास्ती आकारण्यात यावी .
३) १००१ चौ. फुटापुढील निवासी बांधकाम – प्रति वर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट शास्ती आकारण्यात यावी (सध्याच्या दराने). 

चतुर्थ वार्षिक कर आकारणी (कलम 124) कार्यपद्धती

 • चतुर्थ वार्षिक कर आकारणीस येणाऱ्या खर्चास मंजुरी व करयोग्य मूल्याच्या संकलित कराचा कमाल व किमान दर ठरविणे(एकत्रित मालमत्ता कर नियम 1969 च्या नियम क्र. 3 नुसार) नगरपालिका सभेत संमत करणे.
 • कर आकारणी संबधी वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धी देणे.
 • कलम 115 नुसार घरमालक / भोगवटादाराकडून मालमत्तेसंबंधी सविस्तर माहिती असलेला फॉर्म भरून घेणे व इमारतीचे / खुल्या जमिनीचे मोजमाप घेणे.
 • प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याकडून अपेक्षित भाडयाचे दर निश्चित करणे. 
 • मालमत्ता कर देण्यास प्रथमतः दायी असलेल्या व्यक्तीच्या नावाची खात्री करता येत नसेल तेव्हा कर निर्धारणाच्या पुस्तकात “धारक’ म्हणून संबोधणे (कलम 116 (1) व अशा मालमत्ताबाबत प्रत्यक्ष भोगवटादार कर देण्यास स्वतः दायी असेल. (कलम 116 (2) )
 • सर्व मालमत्तांची प्राथमिक कर आकारणी यादी तयार करणे (कलम 115) व ती यादी मान्यतेस प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याकडे तपासणीस पाठवणे.(कलम 117)
 • प्राथमिक कर निर्धारण तातील प्रसिद्धी (कलम 118)
 • आक्षेप दाखल करण्यासाठी ठरविलेल्या वेळेबद्दल जाहीर नोटीस. (30 दिवसांसाठी) (कलम 119) 
 • आलेल्या आक्षेपावर प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकाऱ्या समोर सुनावणी (कलम 120)
 • प्राधिकृत मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याने अंतिम करनिर्धारण यादी अधिप्रमाणित करणे. (कलम 121(1)) व यादी पाहण्यासाठी ठेवल्याबद्दल जाहीर प्रसिद्धी देणे. (कलम 121 (2))
 • वरील सर्व प्रक्रिया 31 जुलै पूर्वी होणे आवश्यक आहे. मुदतीत प्रक्रिया पूर्ण होत नसल्यास प्रक्रिया पूर्ण करणेसाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत वाढ मा.जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे. (कलम 121 (2)) 

मालमत्ता हस्तांतरित करणे

१ ) खरेदीद्वारे

खरेदीद्वारे मालमत्तेच्याच्या हस्तांतरणाकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
१. मालकी हक्काची कागदपत्रे (सात बारा/प्रॉपर्टी कार्ड/खरेदीखत /इंडेक्स)
२. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला.
३. चालू आर्थिक वर्षअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र)

२ ) वारस हक्काने

वारसा हक्काने हस्तांतरण करण्याकरीत खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
१ मालमत्ताधारकाचा मृत्यूचा दाखला
२. वारसहक्काबाबत प्रमाणपत्र/ कोर्ट प्रमाणपत्र, हेअरशिप/सक्सेशन प्रमाणपत्र वारसहक्काबाबत असल्यास त्याची सत्यप्रत/इच्छापत्राची सत्यप्रत
३. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला/भाग हस्तांतरण केल्याच्या दाखल्याची प्रत. ४. चालू आर्थिक वर्षअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र) 

3 ) वाटपा द्वारे

वाटपाद्वारे मालमत्तेच्याच्या हस्तांतरणाकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
१. वाटप पत्र
२. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला.
३. चालू आर्थिक वर्षअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र) 

4 ) बक्षीसपत्र

बक्षीसपत्राव्दारे मालमत्तेच्याच्या हस्तांतरणाकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
१. मालकी हक्काची कागदपत्रे (सात बारा/प्रॉपर्टी कार्ड/बक्षीसपत्र/इंडेक्स)
२. सोसायटी असल्यास सोसायटीचा ना हरकत दाखला.
३. चालू आर्थिक वर्षअखेर संपूर्ण कर भरलेली पावती. (ना देय प्रमाणपत्र)

कर वसुली

 • नगरपरिषदेस देय असलेल्या रक्‍्कमांबद्दल देयक देणे आणि रक्‍कम सत्वर भरलेबद्दल सुट देणे / बिल वाटप – एप्रिल महिन्यात (कलम 150)
 • करांच्या रकमाची विभागणी दोन भागात केली आहे. सहा सहा महिन्याचे दोन भाग
  • 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर
  • 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 
 • बिल दिल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांत कर भरल्यास 1% सूट(कलम 150(3))
 • बिल दिल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यापर्यंत कुठलाही दंड नसेल. परंतू 3 महिन्यानंतर पहिल्या सहामाही
  • 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर रकमेला प्रत्येक महिन्याला 2% दंड असेल. ( कलम 150 अ )
  • 1 ऑक्टोबर ते 31 मार्च रकमेला 31 डिसेंबर नंतर प्रतिमाह 2% असेल. ( कलम 150 अ ) 
 •  प्रत्यक्ष बिले देऊन
 • मागणी पत्राची लेखी नोटीस देऊन
 • थकबाकीदारांच्या तरल मालमत्तेची ( moveable property ) विक्री करुन
 • थकबाकीदारांच्या स्थायी मालमत्तेची अटकावणी व विक्री करणे.
 • थकबाकीदारांचे कोर्टामध्ये सुट (3701) दाखल करुन.
 • घरोघरी जाऊन तगादे करणे.
 • लाउड स्पीकरद्वारे अनाऊसिंग करणे.
 • सरकारी कार्यालयांना नोटीस देणे.
 • थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रात व शहरातील चौकात फलकावर प्रसिद्ध करणे.
 • थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करणे.
 • मालमत्ता जप्तीची कारवाई करणे. 

जप्तीची कार्यवाही

 • मुख्याधिकाऱ्याच्या सहीचे अधिपत्र काढून थकबाकीदाराची जंगम व स्थावर मालमत्तेची अटकावणी करून व ती विकून वसूल करता येईल. (कलम 152)
 • मुख्याधिकाऱ्याने असे अधिपत्र नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला उद्देशून काढले पाहिजे. (कलम 153)
 • थकबाकीदारास अशा आशयाची नोटीस दिली पाहिजे.
 • अधिपत्राची अंमलबजावणी करणेपुर्वी मालमत्तेमध्ये बळाचा वापर करुन इमारतीमध्ये जाणे, (सुर्योदयापासुन ते सुर्यास्तापर्यंत) (कलम 154)
 • स्त्रियांच्या उपयोगासाठी असलेल्या कोणतेही दालन असेल तर, तीन तास आगोदर आपल्या उद्देशाची सूचना देण्यात यावी. (कलम 154) 
 • अधिपत्राची अंमलबजावणी करणे (कलम 155) जंगम मालमत्ता अटकावुन ठेवणे व स्थावर मालमत्ता जप्त करणे कायदेशीर असेल.
 • अपवाद :- पुढील मालमत्ता अटकाव करून ठेवता येणार नाहीत.
  • 1) परिधान करावयाची कपडे, बिस्तारा,
  • 2) कारागिरांची हत्यारे,
  • 3) शेती कामाचे अवजोरे व त्याचे उपजिवीकेसाठी आवश्यक असलेली गुरे व बि-बियाणे.
 • त्यानंतर प्रत्यक्ष जप्तीच्या दिवशी बिगरनिवासी मालमत्ता असेल तर ती सील करण्यात यावी व निवासी मालमत्ता असेल तर थकबाकीच्या रकमेच्या मुल्याइतकी रकमेची वस्तू जप्त करण्यात यावी.
 • अटकावणी केलेल्या साहित्याची सुची करणे. त्या व्यक्तीस अनुसूची सहामधील नमुन्यात एक लेखी नोटीस दिली पाहिजे. (कलम 155) 

महाराष्ट्र नगरपालीका ( एकत्रित मालमत्ता कर ) नियम 1969

१) आकारणी पासुन माफी

1) कोणतीही इमारत किंवा जमीन जिच्यामध्ये संरक्षीत स्मारक आहे किंवा जी प्राचिन स्मारके व पुरातन वस्तु शास्त्रीय जागा.

2) नगरपरिषद मालकीची कोणतीही इमारत किंवा जमीन, केवळ नगरपरिषदेसाठी वापरण्यात येत असेल ती.

3) जी कोणतीही इमारत किंवा जमीन निव्वळ शैक्षणीक किंवा धार्मीक कारणासाठी किंवा विनामुल्य वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येत असेल त्यांना कराच्या दराच्या
निम्म्या दराने आकारणी होईल.

4) सर्व शेतजमीन

* आकारणी पासुन माफी दिलेल्या मालमत्तेची यादी ठेवणे. (कलम 11) 

२) मालमत्ता कर अपील समिती नियम 1995

व्याख्या :- अपील म्हणजे इमारती व जमीन यावरील किंवा या दोन्हीवरील करासंबंधीच्या किंवा त्याच्याशी संबंधीत इतर कोणत्याही येणे रक्कमा असल्यास
त्या संबंधीच्या कोणत्याही हक्‍क मागणी विरुध्द या अधिनियमाच्या कलम 169 पोट कलम 2 अन्वये मालमत्ता कर अपिल समितीकडे करण्यात आलेले अपिल.

समिती :- या अधिनियमाचे कलम 169(2) अन्वये स्थापन करण्यात आलेली कोणतीही मालमत्ता कर अपिल समिती.

समितीचा सचिव मुख्याधिकारी किंवा मुख्यअधिकारी विनिर्दिष्ट करील असा हेडक्लार्क दर्जाच्या, दर्जापेक्षा कमी दर्जाच्या पदावर नसलेला असा इतर कर्मचारी. 

1) नगरपरिषद मालमत्ता कर अपील समिती सदस्य कलम 169 (1)

मालमत्ता कर अपील समितीत पुढील सदस्यांचा समावेश असेल.

1) जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाची नसलेली त्याची नामनिर्देशित व्यक्ती- पदसिद्ध अध्यक्ष

2) मुख्याधिकारी – सदस्य सचिव

3) नगरपरिषदेचा अध्यक्ष – पदसिद्ध सदस्य

4) महिला व बालकल्याण समितीचा अध्यक्ष आणि जेथे अशा समितीची रचना नसेल तर इतर कोणत्याही एका विषय समितीचा अध्यक्ष

5) नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेता

6) संबंधित विभागाचा उपसंचालक , नगर रचना 

2) दंडाधिकाऱ्याचे घंडळ कलम 169 (2)

 • न्याय दंडाधिकाऱ्याकडे किंवा अशा दंडाधिकाऱ्याच्या मंडळाकडे सरळ अपील करता येईल.
 • परंतू नगर परिषद मालमत्ता कर अपील समितीच्या निर्णयाविरुद्ध करावयाचे अपीलही यांच्याकडे करता येईल. 

 3,436 total views,  1 views today

Share This On :

12 thoughts on “कर आकारणी , वसुली व संकलन”

 1. Sir, request for guidance on how to levy other taxes such as tree tax, fire tax, employment guarantee tax, etc. in levying capital based tax.

  Reply
 2. तुम्ही अथक मेहनत करून या वेबसाईट द्ववारे संवर्गीय अधिकारी यांना हि बहुमुल्य माहिती अत्यंत सोप्या व मुद्देसूद भाषेत उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल खरच ऋणी आहे

  Reply
  • नाही. सरकारी जागेवर मालमत्ता असल्यास ५० % सूट देता येते .

   Reply
 3. शैक्षणिक कार्यासाठी मोफत दिलेल्या इमारतींना कर आकारणीतून सूट मिळते का ❓

  Reply
 4. अकृषी झालेल्या रहिवाशी मालमत्तेवर,महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करात अकृषी कर वसुल करता येते का?

  Reply

Leave a Comment

error: