केंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)

केंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम ( (Urban Infrastructure Development Scheme for Small  Medium Towns)

केंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT) ही योजना ३ डिसेंबर २००५ रोजी सुरु करण्यात आली आहे. योजनेचा कालावधी सन २००५-२००६ ते सन २०११-१२ असुन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी रु ९५२.३५ कोटी इतकी तरतुद करण्यात आली आहे. या योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

 • संबंधित महानगरपालिका व नगर परिषदांनी आथिर्कदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनिवार्य व ऐच्छिक सुधारणा लागू करण्याचा निर्णय घेणे व त्याप्रमाणे करार करणे.
 • शहराच्या पुढील ३० वर्षांच्या पायाभूत सुविधा निश्चित करणे.
 • योजनांतर्गत कामासाठी केंद्रशासनातर्फ ८०%, राज्य शासनाचे १०% व संबंधित संस्थेचे १०% प्रमाणे रक्कम उपलब्ध होणार आहे.
 • अनुदान मागणीसाठी शहर विकास आराखडा व प्रकल्प अहवाल तयार करणे.
 • गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीने प्रकल्पास मान्यता दिल्यानंतर केंद्रशासनाकडे असे प्रकल्प मंजुरीसाठी सादर करणे.

UIDSSMT योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य नागरी संस्थने प्रस्ताव मंजूर होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे खालील अटी व शर्ती मान्य करणे गरजेचे आहे. संबंधीत संस्थेने महासभेमध्ये ( सर्वसाधारण सभा ) खालील बाबी ठरावाद्वारे मंजूर करून घेणे आवश्यक आहे.

(१) सदर योजनेच्या एकूण किमतीच्या १०% निधी स्वत: च्या फंडातून उपलब्ध करून देणे.

(२) अनिवार्य व ऐच्छिक सुधारणांचा अवलंब करून त्याची अंमलबजावणी करणे.

अनिवार्य सुधारणा खालील प्रमाणे ( Mandatory Reforms ) :

 1. दुहेरी नोंद लेखा पध्दतीचा वापर करणे.
 2. स्थानिक स्वराज्य संस्था पुरवत असलेल्या सेवा सुविधा बाबतची माहिती माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध करून देणे त्या करीता ई-गव्हर्नस अंमलबजावणी करणे,
 3. मिळकत कर आकारणी करीता GIS पद्धतीचा वापर करणे.
 4. स्थानिक स्वराज्य संस्था पुरवित असलेल्या सेवांच्या खर्चाचा भाग स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडू नये अशा त-हेने सेवा शुल्क आकारणी करणे
 5. शहरी विभागातील गरीब जनतेला मुलभूत सेवा सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करणे
 6. शासनाकडून साध्या पुरविल्या जाणा-या शिक्षण, आरोग्य व सामाजिक सुरक्षितता याव्यतिरिक्त पाणीपुरवठा, घरबांधणी , सांडपाणी, निचरा इ. सारख्या मुलभूत सुविधा वाजवी दरात नागरी गरिबांना पुरविण्याची तरतूद करणे.

ऐच्छिक सुधारणा खालील प्रमाणे ( Optional Reforms ) :

 1. बांधकाम परवानगी उपविधी सुधारणा
 2. शेत जमिनीचं बिनशेतीच्या पध्दतीत रूपांतर करण्यच्या पध्दतीत सुधारणा
 3. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत मिळकतधारक दाखला देण्याची पध्दत सुरू करणे.
 4. खाजगी व शासकीय गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० ते २५ % क्षेत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल  कमी उत्पन्न गटासाटी उपलब्ध करण्यासाठी तरतूद करणे.
 5. जमिन व मिळकतीच्या नोंदीसाठी संगणकाचा वापर करणे.
 6. पावसाचे पाणी साठवणे, जिरवणे यासाठी सक्तीच्या उपाययोजना करणे कामी उपविधीद्वारे तरतूद करणे.
 7. पाण्याच्या पुर्नवापराचे उपविधी करणे.
 8. प्रशासकीय सुधारणांच्या अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे
  1. स्वेच्छानिवृत्ती योजना राबवून प्रशासकीय खर्चात कपात करणे.
  2. निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांची भरती न करणे.
  3. आस्थापना खर्च मर्यादीत आणणे.
  4. प्रशासकीय व वित्तीय सुधारणा करण्याची हमी व अंमलबजावणी.
 9. खाजगी व सार्वजनिक क्षेत्राच्या परस्पर सहकार्याला चालना देणे.

केंद्र शासनाने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाच्या लहान व मध्यम शहरांसाठी पायाभूत सुविधांचा विकास कार्यक्रम (UIDSSMT) या उपअभियाना अंतर्गत एकूण २८२६ कोटी रूपये किमतीचे ९४ प्रकल्प मंजूर केले आहेत. या ९४ प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचा हिस्सा रूपये २२६१ कोटी इतका आहे. या पैकी आतापर्यंत केंद्र शासनाने रूपये १९४९ कोटी इतका निधी मुक्त केलेला आहे या कार्यक्रमा अंतर्गत राज्य शासनाचा हिस्सा एकूण रूपये २८३ कोटी इतका असून केंद्र शासनाने वितरीत केलेल्या अनुदानाच्या प्रमाणात राज्य शासनाने आपल्या हिश्या पोटी द्यावयाच्या रु २३९६० कोटी इतका निधी मुक्त केला आहे. या उपअभियाना अंतर्गत आता पर्यंत ५० प्रकल्प पूर्ण झाले असून अन्य प्रकल्पांचो काम प्रगतीपथावर आहेत (UIDSSMT) या उपअभियाना मध्ये Transit Phase मध्ये नव्याने ४५ प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले असून केंद्र शासनाने त्यापैकी १६ प्रकल्प मंजूर केले आहेत.
सदरची योजना केंद्र शासनाने दि. ३१ मार्च २०१४ रोजी बंद केली असून त्या ऐवजी अमृत ( Atal Mission for Rejuvenation and Urban transformation ) अभियान सुरु केले आहे.

 1,462 total views,  3 views today

Share This On :

Leave a Comment

error: